दोनदा लग्न झालेल्या आमिर खानच्या सेक्स लाईफबद्दल करण जोहरने विचारला तो प्रश्न; अभिनेता म्हणाला, ‘तुझ्या मम्मीला…’

करण जोहरच्या (karan johar) ‘कॉफी विथ करण’ या शोचा चौैथा एपिसोड येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सीझनचे चौथे पाहुणे करीना कपूर खान (kareena kapoor khan) आणि आमिर खान (aamir khan) आहेत. हे दोन्ही सुपरस्टार त्यांच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ (lal singh chadhha) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत आहेत पण या जोडीच्या विनोदबुद्धीने हे स्पष्ट झाले आहे की हा भाग आतापर्यंतचा सर्वात मनोरंजक भाग असणार आहे. शोचा होस्ट करण जोहर दोन्ही खानांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसणार आहे.

या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, जो करण जोहरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. या एपिसोडमध्ये करण जोहर करीना कपूर आणि आमिर खानसोबत त्याच्या सेक्स लाईफवर चर्चा करताना दिसत आहे.

शो दरम्यान करण जोहरने करीना कपूरला गर्भधारणेनंतरच्या सेक्सबद्दल प्रश्न केला आणि विचारले की बाळंतपणानंतर लैंगिक जीवन चांगले असते की नाही. यावर करीना म्हणाली की, “तुला कळणार नाही.” करिनाच्या या प्रतिक्रियेनंतर करण जरा आश्चर्यचकित दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

प्रकरण इथेच संपले नाही. करिनाच्या या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना करण जोहर म्हणाला, “तुम्ही माझ्या सेक्स लाईफवर चर्चा करत आहात, ही चांगली गोष्ट नाही, माझी आई देखील हा शो पाहते.” करण जोहरचे हे बोलणे ऐकून आमिर खाननेही या वादात उडी घेतली आणि म्हणाला, “तुझ्या आईला तू इथे दुसऱ्याच्या सेक्स लाईफवर चर्चा करतोस यात काही अडचण नाही. तू कसा प्रश्न करत आहेस.” माहितीसाठी, आमिर खानचा अनेकवेळा घटस्फोट झाला आहे.

आमिर खानच्या या प्रतिसादाला सगळ्यांनाच पसंती मिळत आहे आणि चाहते आमिरच्या या प्रतिसादाचा व्हिडिओ लाईक आणि शेअर करत आहेत. प्रोमो व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की हा एपिसोड खूप खास असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘नेसली माहेरची साडी…’ खास गाण लावून अलका कुबल यांचा लंडनमध्ये सेंडऑफ, पाहा काय आहे प्रकरण

ज्युनिअर एनटीआरवर कोसळला दुखाःचा डोंगर, कुटूंबातील व्यक्तीने केली आत्महत्या

‘लायकी नसलेल्या लोकांच्या हातात आपण देश दिला…’ अभिनेता सुबोध भावेचा संताप

 

Latest Post