Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड अक्षय कुमारच्या बहूप्रतीक्षित ‘पृथ्वीराज’चा टिझर रिलीझ, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

अक्षय कुमारच्या बहूप्रतीक्षित ‘पृथ्वीराज’चा टिझर रिलीझ, ‘या’ दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता आहे. कोणतेही पात्र असो तो अगदी सहजतेने निभावत असतो. कॉमेडी असो, खलनायक असो, भावनिक असो, ऍक्शन असो किंवा चित्रपटातून कोणता सामाजिक संदेश द्यायचा असो, अक्षय कुमार नेहमीच त्याची प्रत्येक भूमिका चोखपणे बजावत असतो. त्याला आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. तसेच तो आता आपल्याला एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. अक्षय पौराणिक भूमिकेत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षय कुमार शूर योध्दा पृथ्वीराज चव्हाण यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचा टिझर सोमवारी (१५ नोव्हेंबर) रोजी प्रदर्शित झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित असणार आहे. चित्रपटात अक्षय कुमारसोबत सोनू सूद, संजय दत्त आणि मनुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसत आहे. (Akshay Kumar’s pruthviraj movie’s teaser release, movie will release soon)

मनुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसत आहे. जी प्रत्येक प्रसंगात त्यांची साथ देते, अगदी युद्धभूमीवर देखील उतरते. चित्रपटाचा टिझर पाहूनच चित्रपट किती भव्यदिव्य स्वरूपात असणार आहे याचा अंदाज येतो. चित्रपटात अक्षय कुमार पहिल्यांदाच युद्ध भूमीवर उतरलेला दिसणार आहे.

पृथ्वीराज या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत, तर आदित्य चोप्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाला शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. चित्रपट २१ जानेवारी २०२१ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टिझर पाहून अक्षय कुमारचे चाहते हा चित्रपट बघण्यास खूप उत्सुक झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा