Monday, July 8, 2024

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमा ‘या’ दोन राज्यामध्ये झाला टॅक्स फ्री, जाणून घ्या टॅक्स फ्री झाल्यानंतर काय फरक पडतो

सध्या अक्षय कुमार त्याच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘सम्राट पृथ्वीराज’ सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सर्वत्र फक्त अक्षयच्या पृथ्वीराजचीच चर्चा असून त्याचे फॅन्स आणि सिनेप्रेमी सर्वच या चित्रपटाची वाट बघत आहे. यशराजचा मोठा सिनेमा असल्याने बॉलीवूडला देखील या सिनेमाकडून खूप अपेक्षा असल्याने हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर काय धुमाकूळ घालतो हे लवकरच समजेल. नुकताच या सिनेमाची स्क्रीनिंग झाली. या स्क्रीनिंगला उपस्थित असणाऱ्या सर्वच दिग्गजांनी या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे. गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा भव्य सिनेमा पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर हा सिनेमा यूपीमध्ये टॅक्स फ्री करण्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या सिनेमाचा हा खास शो २ जून रोजी लखनऊच्या लोकभवन मध्ये आयोजित केला होता. उत्तरप्रदेशसोबतच मध्यप्रदेशमध्ये देखील हा सिनेमा टॅक्स फ्री केला गेला आहे.

जेव्हा तुम्ही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहिला जातात तेव्हा तुम्ही जे तिकीट खरेदी करतात त्याचे दोन भाग होतात. पहिला असतो बेस प्राईज आणि दुसरा असतो टॅक्स. चित्रपटाची बेस प्राईज ही चित्रपटाच्या बजेटवर ठरवली जाते. तर तिकिटावर जो टॅक्स लागतो तो जीएसटी आणि सेंट्रल जीएसटीच्या रूपात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाटला जातो.

२०१७ सालच्या आधी चित्रपटाच्या तिकिटावर मनोरंजन टॅक्स लागायचा. किती टॅक्स लावायचा याचा निर्णय राज्य सरकार ठरवायचे. मात्र २०१७ मध्ये जीएसटी आल्यानंतर राज्य सरकारकडून हा अधिकार घेण्यात आला. आता देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात चित्रपटाच्या तिकिटावर २८ टक्के जीएसटी लावला वाजतो. हा जीएसटी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सम प्रमाणात वाटला जातो. यामध्ये जेव्हा एखादे सरकार त्यांच्या राज्यामध्ये चित्रपट टॅक्स फ्री करते तेव्हा याचा अर्थ असतो की, राज्य त्याच्या वाट्याचा जीएसटी वसूल करणार नाही. असे केल्यामुळे तिकिटाचे दर कमी होतात आणि याचा फायदा प्रेक्षकांना मिळतो. सर्वसामान्यपणे समाजासाठी उपयुक्त चितार्पत टॅक्स फ्री केले जातात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा