जेव्हा राज कपूरचं ऐकूण, पद्मिनी कोल्हापूरेंनी ऋषी कपूर यांना लगावल्या ८ कानशिलात; मग पुढे…


हिंदी चित्रपटसृष्टीतील आभिनेते राज कपूर यांनी आपले अभिनयाने अविस्मरणीय चित्रपट इंडस्ट्रीला दिले. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवीन दिशा दाखवली. राज कपूर हे एकमेव अभिनेते होते, जे अभिनेत्रींना रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन करायला लावू शकत होते. त्याचबरोबर समाजात प्रचलित असलेल्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींवर ते चित्रपटामार्फत सडेतोड उत्तरे द्यायचे. मात्र, १९८२ मध्ये ३९ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘प्रेम रोग’ (Prem Rog) चित्रपट आठवतोय का? या चित्रपटात ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरेंनी प्रमुख भूमिका साकारली आहे. शूटिंग दरम्यान, ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांंनी पद्मिनी कोल्हापूरे यांना (Padmini Kolhapure) प्रपोज केला होता. त्यावेळी पद्मिनींनी ऋषी कपूर यांना एक- दोन नाही, तर अनेक चापटा मारल्या होत्या. या सीनसाठी खूप वेळा रिटेक करावा लावला होता.

खरं तर ‘प्रेम रोग’ या चित्रपटात एक तरुण विधवेवर प्रेम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. पद्मिनी विधवा होती, तर ऋषी तिच्यावर प्रेम करणाऱ्या एका तरुणाची भूमिका साकारत होता. सीननुसार ऋषींनी प्रेम व्यक्त करताच पद्मिनीला रागाच्या भरात चापट मारायची होती. पण त्यावेळी पद्मिनीने इंडस्ट्रीत नव्याने पदार्पण केले होते. ऋषी यांना चापट मारायचा सीन अनेकदा करण्यात आला. (bollywood padmini kolhapure slapped rishi kapoor)

या सीनमध्ये जोपर्यत उत्तम शाॅट येत नाही, तोपर्यंत राज कपूर यांनी हा सीन अनेकदा करायला लावला. त्यावेळी जवळजवळ ८ वेळा हा सीन करण्यात आला. पण तोपर्यंत ऋषी कपूर यांचे गोरे गाल लाल झाले होते. हा सीन संपल्यानंतर ऋषी कपूर प्रचंड चिडले होते.

‘प्रेम रोग’ चित्रपटाची कथा एका सामान्य कुटुंबातील एका तरुणाची आहे, ज्याला जमीनदार कुटुंबाच्या विधवा स्त्रीवर प्रेम होते. त्याला आपल्या प्रेमामुळे कुटुंब आणि समाजाच्या विरोधाला सामोरे जावे लागते. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात शम्मी कपूर, तनुजा आणि नंदा सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक राज कपूर होते. असे म्हटले जाते की, राज कपूर यांच्यावर या चित्रपटामुळे टीकाही झाली आणि कौतुकही केले गेले. मात्र, त्या काळात त्यांनी हा धोका पत्करला होता.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!