‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर (पाठक बाई) आणि हार्दिक जोशी (राणा दा) यांना प्रचंड ओळख मिळाली. अक्षया यात बरीच साधी आणि सोज्वळ दाखवण्यात आली होती. मात्र ती खऱ्या आयुष्यात तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. याची झलक तुम्हाला तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहायला मिळेलच. अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय पाहून तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असेच तिचे भुरळ पाडणारे फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अक्षयाचा मनमोहक अंदाज पाहायला मिळाला आहे. या फोटोंमध्ये अक्षयाने मरून रंगाची साडी, तर पांढऱ्या रंगाचं ब्लाउज परिधान केलं आहे. केस मोकळे सोडून तिने साधा मेकअप केला आहे. डोळ्यावर लावलेल्या गॉगलने तर अभिनेत्रीच्या स्टाईलमध्ये आणखीच भर टाकली आहे. पहिल्या फोटोमध्ये अक्षया मनमोकळेपणाने हसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती तिचा कातिलाना अंदाज दाखवत पोझ देत आहे. (akshaya deodhar looking gorgeous in saree)
हे फोटो अक्षयाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. ज्यातील तिचा भुरळ पाडणारा लूक चाहत्यांना चांगलाच भावला आहे. यातील अभिनेत्रीची सुंदरता अनेकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. अगदी कमी कालावधीत या फोटोवर ५७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहे. तसेच चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्या कौतुकांचे पूल बांधत आहेत. फोटो शेअर करत अक्षया कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “सफर खूबसूरत है, मंजिल से भी…” यासोबत तिने एक रेड हार्ट ईमोजीही पोस्ट केला आहे.
अक्षयाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे तिला ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका मिळाली आणि याच मालिकेने अभिनेत्रीला घराघरात पोहचवले. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच लाखो रसिकांची मने जिंकली आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ