Saturday, March 28, 2026
Home बॉलीवूड ‘कमबॅक किंग’ म्हणून गाजलेला स्टारकिड, तर याने दमदार भूमिकांनी हिरोलाही टाकलं होत मागे

‘कमबॅक किंग’ म्हणून गाजलेला स्टारकिड, तर याने दमदार भूमिकांनी हिरोलाही टाकलं होत मागे

अक्षय खन्ना हा बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि ते गाजले सुद्धा आहेत. अक्षय खन्नाच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात या अभिनेत्याने स्थान निर्माण केले आहे. तर तो सध्या त्याच्या ‘धुरंधर’  चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने रहमान या दरोडेखोराची भूमिका साकारली होती. या भूमिकेने नायकालाही मागे टाकले होते आणि त्याचे डान्स मूव्ह्स व्हायरल झाले होते. तर आज अक्षय खन्नाचा वाढदिवस आहे. आज तो 51 वर्षांचा झाला आहे. तर यानिमित्ताने अक्षय खन्नाच्या कारकिर्दीबद्दल आणि कमबॅकच्या कहाणीबद्दल जाणून घेऊया.

अक्षय (akshay)खन्नाला 2010 च्या दशकात केस गळतीमुळे चित्रपटसृष्टीने त्याला बाजूला सारले होते. मात्र, त्याच्या उत्तम अभिनयाने आणि ध्यासाने त्याचे स्टारडम कायम राखले आहे. अक्षय खन्नाचा जन्म 1975 मध्ये आजच्या दिवशी झाला. तर या अभिनेत्याचे वडिल हे बॉलिवूड स्टार विनोद खन्ना आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच तो चित्रपटसृष्टीच्या संपर्कात आला. मोठे झाल्यावर त्याने वडिलांच्या अभिनयाचा मार्ग स्वीकारला आणि 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून अक्षय खन्नाने पदार्पण केले़. यानंतर, 1997 मध्ये ‘बॉर्डर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याने ‘ताल’, ‘हमराज’, ‘हंगामा’, ‘हुलचुल’ आणि ‘आक्रोश’ यांसारख्या अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये काम केले.

2017 मध्ये त्याने ‘इत्तेफाक’ या चित्रपटात काम केले असले तरी, त्यापैकी कोणत्याही प्रोजेक्टमुळे त्याला विशेष ओळख मिळाली नाही. तथापि, 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने त्याला प्रचंड प्रशंसा मिळवून दिली आणि त्याला ‘कमबॅक किंग’ म्हणून स्थापित केले. आज अक्षय खन्नाचा 51 वा वाढदिवस असून, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

प्राइम व्हिडिओवरील दमदार सिरीज, पहिल्या 9 एपिसोड्सनी जिंकली मनं, तर आता येतोय पार्ट 2

हे देखील वाचा