Monday, June 23, 2025
Home अन्य बोलता बोलताच जुंपली! अभि लतिकाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बोलता बोलताच जुंपली! अभि लतिकाच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांशी एक विशेष नाते आहे. मालिकेत अभिमन्यू आणि लतिकाची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांची लवस्टोरी सर्वांनाच खुप आवडते. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते जोरदार भांडण करताना दिसत आहेत. 

हा व्हायरल व्हिडिओ लतिका म्हणजेच अक्षया नाईकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहायला मिळतात. मात्र त्यानंतर लगेच ते जोरजोराने भांडायला सुरूवात करतात. अक्षयाने हा व्हिडिओ शेअर करत प्यार सब मोह माया है असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा –

मृत्यूची खोटी बातम्या पसरवल्याने नेटकऱ्यांवर भडकली अनन्या चॅटर्जी, पोस्ट शेअर करून केला पाणउतारा
सहाय्यक अभिनेता म्हणून दीपक तिजोरींना मिळाले यश; ‘या’ दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या अभिनेत्रींना…
निक्कीच्या मोहक फोटोंनी चाहते आऊट ऑफ कंट्रोल, बिकिनीत पाहायला मिळाला कमनीय बांधा अन् नागमोडी कंबर

हे देखील वाचा