Monday, October 14, 2024
Home कॅलेंडर सहाय्यक अभिनेता म्हणून दीपक तिजोरींना मिळाले यश; ‘या’ दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या अभिनेत्रींना…

सहाय्यक अभिनेता म्हणून दीपक तिजोरींना मिळाले यश; ‘या’ दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या अभिनेत्रींना…

अभिनेते दीपक तिजोरी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले नाव तर कमावलेच, त्याचबरोबर प्रसिद्धीही मिळवली आहे. दीपक तिजोरी यांचा शनिवारी (28 ऑगस्ट) 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दीपक तिजोरी यांनी बॉलिवूडमध्ये खूप मेहनत घेतली, पण मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत ते कधीच हिट होऊ शकले नाही. मात्र, सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांनी अनेक पात्र गाजवली आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…

दीपक (Dipak tijori)यांचा जन्म 28 ऑगस्ट, 191रोजी मुंबई येथे झाला होता. बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन दीपक मुंबईत आले होते, पण त्यांना पहिला चित्रपट ‘तेरा नाम मेरा नाम’ हा मिळाला होता. ज्यात त्यांनी सहाय्यक अभिनेता म्हणून पात्र साकारले होते. दीपक यांचे शिक्षण नरसी मुंजी महाविद्यालयात झाले होते. जेथे त्यांना चित्रपटांची गोडी निर्माण झाली होती. त्यानंतर ते एका थिएटर ग्रूपमध्ये सहभागी झाले होते. ज्यात आमिर खान, आशुतोष गोवारीकर, परेश रावल यांसारखे कलाकार होते. या गटातील दीपक यांच्या कामगिरीचे अनेकदा कौतुक झाले आणि अशातच त्यांच्या मनात अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली. (Actor Deepak Tijori wanted to be a top actor)

सहाय्यक अभिनेता म्हणून ठरले हिट
या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी आणखी बरेच चित्रपट केले, जे खूप हिट देखील होते. परंतु जवळजवळ सर्व हिट चित्रपटांमध्ये दीपक तिजोरी हे सहाय्यक अभिनेता म्हणूनच पात्र साकारताना दिसले होते. दीपक यांनी ‘आशिकी’, ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हां कभी ना’, ‘अंजाम’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते. या चित्रपटांमध्ये दीपक यांचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता. दीपक यांना अभिनयक्षेत्रात अव्वल अभिनेता बनण्याची इच्छा होती, पण त्यांची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

पण त्यांची ही इच्छा एकदा पूर्ण झाली. ते म्हणजे साल 1993 मध्ये आलेल्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात त्यांना अभिनेता म्हणून संधी मिळाली. या चित्रपटात शाहरुख खान आणि आमिर खान देखील होते. तसेच पूजा भट्ट आणि रवीना टंडन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मात्र, इतकी मजबूत स्टारकास्ट असून ही हा चित्रपट फ्लॉप झाला आणि दीपक यांना अभिनेता म्हणून यशस्वी होता आले नाही.

अभिनेते दीपक तिजोरी शाहरुख खानसोबत ‘कभी हा कभी ना’ आणि ‘अंजाम’ चित्रपटांमध्ये दिसून आले होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये दीपक तिजोरी यांना अभिनेत्रीही मिळाली होती, पण शाहरुख खानसोबत एकही अभिनेत्री नव्हती. तरीही त्याने दीपक यांना मागे टाकले आणि दीपक पुन्हा एकदा सहाय्यक अभिनेता म्हणून मर्यादित राहिले.

https://www.facebook.com/photo.php?fbid=10212902750622801&set=t.725260702&type=3

यानंतर दीपक तिजोरी यांनी चित्रपट दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. 2003 मध्ये एका ऍडल्ट चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट नाकारला गेला. सेन्सॉर बोर्डातही हा चित्रपट बोल्ड आशय आणि दृश्यांमुळे अडकला होता. यानंतर त्यांनी आणखी बरेच चित्रपट दिग्दर्शित केले. ज्यात ‘टॉम डिक आणि हॅरी’, ‘फॉक्स’ आणि ‘खामोशी- खवु की एक रात’ हे चित्रपट फ्लॉप ठरले.

हेही नक्की वाचा-
चक्क ‘या’ कपड्यांमध्ये उर्फी जावेद दिसली खेळताना, नेटकरी म्हणाले, ‘चप्पले मारल…’
चक्क ‘या’ कपड्यांमध्ये उर्फी जावेद दिसली खेळताना, नेटकरी म्हणाले, ‘चप्पले मारल…’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा