मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नावीन्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये आता रंगभूमीही मागे नाही. मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा ‘अलबत्या गलबत्या बे’ बालनाट्य प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे बच्चे कंपनींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या गाजलेल्या नाटकाचा आनंद मुलांना येत्या दिवाळीत घेता येणार आहे. याची घोषणा नाटकातील मुख्य कलाकार वैभव मांगले यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अलबत्या गलबत्या नाटकातील चेटकीण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेते वैभव मांगले खट्याळ चेटकीणीची भूमिका साकारणार आहेत. या गाजलेल्या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले आहे, तर दिग्गज अभिनेता चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अलबत्या गलबत्या या बालनाटकाची निर्मिती झी मराठी आणि अद्वेत थिएटरने केली आहे. ऐन दिवाळीत ही चेटकीण बालचमूंना हसवायला येणार असल्याने त्यांच्यासाठी ही ग्रेट भेटचं ठरणार आहे.
नाटकात चेटकिणीच्या भूमिकेत असलेल्या वैभव मांगलेकरांनी सोशल मिडीयावर यासंबधीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी दिवाळीत भेटीला येत आहे असे कॅप्शन दिले आहे. ही विनोदी चेटकीण मुलांना कधी हसवते तर कधी मुलांना भिती दाखवते. १९७२ मध्ये अलबत्या गलबत्या हे नाटक पहिल्यांदा रंगभूमीवर आले होते. यावेळी या नाटकात चेटकिणीची भूमिका अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी साकारली होती. या भूमिकेत दिलीप प्रभावळकर यांनी आणलेला जिवंतपणा त्याकाळात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. या नाटकाने रंगमंचावर त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-