हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) दिल्लीमधील निवासस्थानी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये १.४१ कोटी रुपये आणि दागिने लंपास केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या घटनेची तक्रार सोनम कपूरच्या सासूने दिल्ली पोलिसांकडे केली आहे. या धक्कादायक बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास दिल्ली पोलिस करणार आहेत.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनम कपूरचा पती आनंद अहुजाच्या दिल्लीमधील घरी मोठा दरोडा पडला असल्याची बाब समोर आली आहे. या चोरीमध्ये तब्बल १.४१ कोटी रोख रक्कम आणि दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. ही धक्कादायक बाब समोर येताच सोनम कपूरच्या सासूने दिल्लीमधील तुघलक पोलिस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच दिल्ली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत शोधाशोध सुरू केली आहे. ही घटना अत्यंत हायप्रोफाइल असल्याने पोलिसांनी अनेक पथके तयार केल्याचेही यामध्ये सांगितले आहे. या घटनेची सध्या सिनेजगतात चर्चा सुरू आहे.
दरम्यान सोनम कपूरच दिल्लीमधील घर खूपच आलिशान आहे. घराच्या देखभालासाठी आणि कामासाठी अनेक नोकर चाकर आहेत. ड्रायव्हर, माळी, ९ केअर टेकर आणि २५ नोकर इतकी भक्कम सुरक्षा असताना झालेली चोरी खूपच गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे. आपल्या तक्रारीत सोनम कपूरच्या सासू सरला अहूजा यांनी हे दागिने मी दोन वर्षापूर्वी कपाटात ठेवले होते. मात्र काल पाहिले असता हे सर्व दागिने गायब असल्याचे म्हणले आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करण्याचे आव्हान दिल्ली पोलिसांपुढे आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –