Friday, July 5, 2024

सलमानच्या गाण्यात डान्स केलेली मुलगीच पटवली दिग्दर्शकाने, गुपचूप केलं लग्न

दबंग अभिनेता सलमान खानचा ‘भारत’, ‘टायगर जिंदा है’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक अली अब्बास जफर हळू हळू आपल्या नव्या लग्नाचे पत्ते उघडत आहे. शुक्रवारी त्याने आपली पत्नी अलिसिया जफरचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात अलिसिया वधू म्हणून दिसली आहे. या फोटोत, अलीने कोणतही कॅप्शन लिहिलं नाहीत, हृदयाचा फक्त एक लहान इमोजी त्याने फोटोला दिला आहे, जो त्याच्या भावना दर्शवण्यासाठी पुरेसा आहे.

अलीने अचानक त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची घोषणा करून त्याच्या सहकाऱ्यांना आणि प्रियजनांना आश्चर्यचकित केलं. हे लग्न ३ जानेवारीला झालं. अलीने अचानक खुलासा केला की जवळपास एका आठवड्यापूर्वी त्याने मूळ गावी डेहराडून येथे अलीसियाशी लग्न केलं होतं. त्याच वेळी त्याने अलीसियाबरोबर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. यावर त्याच्या मित्रांच्या आणि चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आलेली आहे.

अलीने सोशल मीडियावरुन खुलासा केला की त्याचं लग्न झालं आहे, पण अलीसिया कोण होती आणि अलीशी ती कशी भेटली हे अलीने सोशल मीडियावर नव्हे तर एका मुलाखतीत उघड केलंय. अलीने सांगितलं की, अलीसिया सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाच्या ‘स्लो मोशन’ गाण्यात सगळेच थिरकताना दिसतात. या गाण्यात ती दिशा पाटनीसोबत नाचताना दिसली होती. तथापि, या गाण्यात बर्‍याच परदेशी मुली नाचत आहेत, म्हणून कोणीही अलीसिया याकडे लक्ष दिले नाही.

अलीने अलिसीया फ्रान्समधील रहिवासी असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ‘सुरुवातीला अलीसियाला व्हिसा मिळविण्यात खूप अडचण येत होती. पण, तीचा व्हिसा मिळताच आम्ही त्वरित एकत्र देहरादूनला गेलो आणि लग्न झालं. हे नेहमीच अशाच प्रकारे नियोजित केले पाहिजे. अलिशिया ही वास्तव्यास फ्रान्सची असून ती मूळची इराणी आहे. मी जेव्हा माझ्या कामानिमित्त मी फ्रान्सला एकदा गेलो होतो, तेव्हा मी तीला पाहिल्याबरोबर तीच्या प्रेमात पडलो. मी तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत राहिलो. हे माझ्यासाठी एक कठीण काम होतं पण शेवटी मला आनंद आहे की तिने माझ्याशी लग्न करण्यास होकार दिला.’

अली आणि अलीसियाची भेट ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. अ‍लीसियाला अभिनयात रस नाही. अलीने सांगितले आहे की ‘भारत’ चित्रपटाच्या ‘स्लो मोशन’ गाण्यातील तिचा सीन फक्त मनोरंजनासाठी होता. प्रत्यक्षात, अलिसिया एक फ्रेंच मॉडेल आहे आणि तिला तांत्रिक काम अधिक आवडतात. तिला दिग्दर्शनात रस आहे. आता अली आणि अलीसिया विवाहित आहेत आणि त्यांच्या मित्रांनादेखील हे समजलं आहे. तर अलीलाही आपल्या मित्रांसाठी वेडिंग पार्टी करायची आहे. परंतु, देशात अद्याप करोना साथीचा रोग कायम असल्याने पार्टीचे आयोजन करण शक्य नाहीये.

हे देखील वाचा