Friday, July 12, 2024

आलिया भट्टने एसएस राजामौली यांच्यासोबतच्या वादावर दिले स्पष्टीकरण, सांगितले पोस्ट डिलीट करण्याचे कारण

दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट सध्या देशभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने दाक्षिणात्य चित्रपट जगतात जोरदार पदार्पण केले आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S.Rajamouli) यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इतकेच नव्हे, तर अभिनेत्री आलियाने दिग्दर्शकाला सोशल मीडियावरुन अनफॉलो केल्यााचीही बातमी समोर आली होती. याबद्दल आता पहिल्यांदाच आलियाने प्रतिक्रिया दिली आहे. 

आलिया भट्टने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्यात आणि ‘आरआरआर’ चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्यात वाद झाल्याच्या बातमीवर स्पष्टकरण दिले आहे. याबद्दल ती म्हणते की, “सोशल मीडियावरील चर्चेवरुन मला समजले की मी ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दलच्या पोस्ट डिलिट केल्या आहेत कारण मी त्यांच्यावर नाराज आहे. असे समजणाऱ्या प्रत्येकाला मी सांगते की अशा बातम्या पसरवू नका, या बातमीत काहीही तथ्य नाही. मी नेहमीच माझ्या जुन्या पोस्ट डिलीट करत असते. त्यामुळेच मी त्या पोस्ट डिलीट केल्या आहेत, त्यामुळे याबाबतीत काहीही नाराज होण्याचा संबंध नाही.”

या चित्रपटाच्या अनूभवाबद्दल बोलताना ती म्हणते की, “या चित्रपटात काम करुन मला खूप आनंद मिळाला. खूप नवीन गोष्टी मला शिकायल्या मिळाल्या. RRR चा एक भाग असल्याबद्दल मी आभारी आहे. मला सीतेचे पात्र साकारायला खूप आवडले. एसएस राजामौली सरांनी मला दिग्दर्शित केले, मला खूप गोड वाटले. तारक आणि चरणसोबत काम करताना मला आनंद होत आहे. मला मिळालेल्या या चित्रपटाशी संबंधित सर्व गोष्टी आणि अनुभवाबद्दल मी आभारी आहे.”

आलियाने तिच्या पोस्टच्या शेवटी “मी या बातमीचे सत्य सांगत आहे कारण राजामौली सर आणि चित्रपटाच्या टीमने ही बातमी बनवण्यात खूप मेहनत घेतली आहे. मला चित्रपटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची अफवा पसरवायची नाही.” असे सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला  आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा