बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) आयुष्यातील असे अनेक किस्से आहेत, जे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आलिया भट्ट प्रसिद्ध चित्रपट निर्माता महेश भट्ट यांची मुलगी आहे. एकदा तिने अनुपम खेर यांच्या शोमध्ये एक किस्सा शेअर करताना सांगितले होते की, तिला तिचे वडील महेश भट्ट यांनी एका गोष्टीसाठी खूप जोरात फटकारले होते.
कलाकार म्हटले की आपल्याला तिच्या जीवनाचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. नेम, फेम, मनी या आजच्या काळातील सर्वात महत्वाच्या वाटणाऱ्या तिन्ही बाबी त्यांच्याकडे अगदी सहज उलब्ध असतात. कलाकरांना कोणी घरी प्रश्न विचारणारे नसते हा पण एक लोकांचा मोठा भ्रम असतो. मात्र असे अजिबात नाही कलाकार असले तरी ते त्यांच्या घरच्यांना उत्तर दयायला बांधील असतात, त्यांचे आईवडील सतत त्यांच्यावर लक्ष ठेऊन असतात. कलाकार असल्यामुळे तर त्यांच्यावर जास्त जबाबदारी असते. बॉलिवूडची बबली गर्ल असलेल्या आलिया भट्टला देखील तिच्या आईवडिलांकडून नेहमीच ओरडा बसतो. असाच एक किस्सा आलियाने एका मुलाखतीदरम्यान सर्वाना सांगितला होता.
आलिया भट्टने अनुपम खेर यांच्या शोमध्ये सांगितले होते की, तिचे वडील असणाऱ्या महेश भट्ट यांनी एकदा तिला फटकारले होते. कारण ती एकदा खोटे बोलून रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेली आणि उशिरा घरी आली होती. आलिया घरी आल्यावर महेश भट्ट म्हणाले की, “जेव्हा तू अभिनय किंवा चित्रपटात येते, तेव्हा तुला तुझे काम गांभीर्याने घ्यावे लागते. कामाच्या दरम्यान अशा पद्धतीची बेजबाबदार जीवनशैली योग्य नाही.” (alia bhatt get scolded by mahesh bhatt for partying alia fights with her mother the anupam kher show)
पुढे अनुपम खेर यांनी आलियाला प्रश्न केला की, तिचे तिच्या आईसोबत कधी भांडण झाले आहे का? यावर आलियाने उत्तर दिले की, त्या मायलेकींमध्ये दर दोन-तीन दिवसांनी भांडणं होतच असतात. सोबतच आलिया भट्टने या शोमध्ये सांगितले की, ती तिच्या पालकांसोबत तिचे सिक्रेट्स शेअर करत नाही. ती तिच्या बहुतेक गोष्टी शाहीन भट्टला म्हणजेच तिच्या बहिणीला सांगत असते.
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीचे सध्या बरेच चित्रपट लाईनमध्ये आहेत. आलिया ‘आरआरआर’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती इतरही अनेक चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास
धक्कादायक! मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केली तिची सुसाईड नोट म्हणाली, ‘माझ्या आत्महत्येला…’