आलिया भट्टच्या बॉयफ्रेंडवर फिदा झाली वाणी कपूर; म्हणाली, ‘तो खूपच सभ्य आणि…’


बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) लवकरच रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. वाणी कपूर ‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीर कपूरसोबत मुख्य भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वाणीने रणबीरसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. यावेळी तिने रणबीरचे तोंडभरून कौतुक केलेले पाहायला मिळाले.

रणबीरबद्दल बोलताना वाणी म्हणाली, “खर सांगू, तर तो ज्याप्रकारे अभिनेता आहे, त्याबद्दल मला त्याचा खूप आदर आहे. तो असा सह-अभिनेता आहे, ज्याला कसलाही अभिमान नाही आणि तो स्टारसारखा अजिबात वागत नाही. तो एक अतिशय सामान्य, डाउन टू अर्थ, अतिशय सभ्य व्यक्ती आहे. त्याच्यासोबत काम करताना, त्याला स्टारडमचा गर्व आहे, असे कधीच वाटत नाही. मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे आणि मला त्याचे काम आणि त्याचे चित्रपट पाहायला खूप आवडतात.” (vaani kapoor calls shamshera co actor ranbir kapoor down to earth and very humble)

करण मल्होत्रा ​​दिग्दर्शित ‘शमशेरा’ पुढील वर्षी १८ मार्चला रिलीझ होणार आहे. ही कथा आहे १९व्या शतकातील एका डाकू जातीची, जे आपल्या हक्कांसाठी इंग्रजांशी संघर्ष करतात. या चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूर यांच्याशिवाय संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटातील आपल्या पात्राबद्दल बोलताना वाणी म्हणाली, “हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे. हा ‘बेल बॉटम’सारखा पीरियड ड्रामा चित्रपट नाही. मी अशी भूमिका कधीच केली नाही. रणबीरनेही यापूर्वी असा चित्रपट केलेला नाही. अशा चित्रपटात काम करताना खूप मजा येते.”

वाणीचा ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वाणीने ट्रान्सवुमनची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!