Wednesday, June 26, 2024

राम मंदिराच्या उद्घाटनाला बॉलिवूड कलाकारांची देखील लागणार हजेरी, आलिया आणि रणबीरला मिळाले निमंत्रण

उत्तर प्रदेशातील अयोध्येत श्री राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने केवळ राजकीय जगतातीलच नव्हे, तर चित्रपट जगतातील अनेक व्यक्तिमत्त्वांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. काल गायक सोनू निगमलाही आमंत्रित करण्यात आलं होतं. यासोबतच आता या यादीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचीही नावं आली आहेत. दोघांनीही निमंत्रण स्वीकारले असून, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. दोन्ही स्टार्सना श्री रामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, आरएसएस कोकणचे प्रांतीय प्रचार प्रमुख अजय मुडपे आणि निर्माता महावीर जैन यांच्याकडून आमंत्रणे मिळाली आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनेही याचे छायाचित्र शेअर केले आहे.

रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, टायगर श्रॉफ, अनुपम खेर, अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, सनी देओल आणि अजय देवगण आणि सोनू निगम, साऊथचे सुपरस्टार यश आणि प्रभास यांच्यासह अनेक स्टार्सना श्री रामच्या उद्घाटन सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे. जानेवारी महिन्यात जगभरातून लाखो भाविक अयोध्या आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक शहरांना भेट देतील. अशा परिस्थितीत अयोध्येच्या हरवलेल्या वैभवाची प्रतिमा त्यांना दाखवून देण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून येथे येणाऱ्या अन्य प्रांतातील भाविकांना अयोध्येतील तीर्थक्षेत्रांची यात्रा तसेच समृद्ध वारशाची माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘गली बॉय’ला ऑस्करसाठी पाठवल्यावर विजय सेतुपती झाला होता नाराज, केला मोठा खुलासा
आता होणार फुल राडा! किरण माने यांची राजकारणात धमाकेदार एंट्री, ‘या’ पक्षात केला प्रवेश

 

हे देखील वाचा