Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड लग्नानंतर तीन महिन्यातच आलियाकडून गुड न्यूज! चाहते म्हणताहेत, ‘नक्की लग्ना…’

लग्नानंतर तीन महिन्यातच आलियाकडून गुड न्यूज! चाहते म्हणताहेत, ‘नक्की लग्ना…’

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सतत चर्चेत असतात. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. अशातच आता या जोडप्याबद्दल गोड बातमी समोर येत आहे. आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा बनणार आहेत.

होय! आलियाने तिच्या गरोदरपणाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने अल्ट्रासाऊंड अपॉइंटमेंट घेत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आमचे बाळ लवकरच येत आहे.” या फोटोमध्ये आलिया हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. तिच्या बेडच्या शेजारी कोणीतरी बसले आहे, ज्याची मागची बाजू दिसत आहे. बहुधा तो अभिनेता रणबीर कपूरच असावा. दोघेही अल्ट्रासाऊंड मशीनच्या मॉनिटरकडे बघत आहेत. (alia bhatt ranbir kapoor Announces pregnancy)

यात आलिया भट्ट खूपच आनंदी दिसत आहे. मात्र, मॉनिटरच्या डिस्प्लेला मोठे हार्ट स्टिकर लावण्यात आले आहे. यासोबतच तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सिंहांचे एक कुटुंब दिसत आहे. ज्यामध्ये एक सिंहीणी सिंहाला प्रेमाने मिठी मारत आहे त्यांचे शावक त्यांना पाहत आहे.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने गूडन्यूज दिली आहे. आलिया आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिलला वांद्रे येथील आरके हाऊसमध्ये झाले. या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तसेच दोघेची लवकरच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एकत्र दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा