आलियाने रणबीरशी केले गुपचूप लग्न? व्हायरल फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Alia Bhatt And Ranbir Kapoor Gets Married Expect Fans After A Bridal Pic of Actress Gets Viral


‘स्टुटंड ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आलिया भट्ट हिने चांगली प्रसिद्धी कमावली आहे. सध्या तिचे बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. यामागचे कारण म्हणजे अभिनेत्री आलियाने आपल्या हातांवर मेहंदी लावून देखण्या नवरीप्रमाणे सजलेला आपला फोटो शेअर केला. तिचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर एकच धुमाकूळ उडाला.

चाहत्यांनी अनेक अंदाज बांधायला सुरुवात केली की, कदाचित आलियाने रणबीरसोबत गुपचूप लग्न केले आहे.

खरं तर आलियाने शेअर केलेला फोटो एका शूटिंगसाठी होता. यावर चाहत्याने म्हटले की, “आम्ही आलियाला एक नवरी म्हणून केव्हा पाहू शकेल?” दुसऱ्या एका चाहत्याने म्हटले की, ”आता तू लवकरच रणबीरसोबत लग्न कर.”

तरीही हा फोटो काही वेळानंतर डिलिट करण्यात आला. परंतु तोपर्यंत चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी बॉलिवूडच्या सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. अशामध्ये चाहत्यांची त्या दोघांच्याही लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आलिया भट्ट ही चित्रपट निर्माता ‘महेश भट्ट’ यांची मुलगी आहे. आलियाने ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’, ‘उडता पंजाब’ या चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

ती संजय लिला भंसाळी दिग्दर्शित आपल्या आगामी ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत सोनाक्षीने पोस्ट केली भावनिक कविता, पाहा व्हिडिओ
-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न
-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

 


Leave A Reply

Your email address will not be published.