वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न

Happy Birthday Tina Munim Life Interesting Facts


ऐंशीचे दशक गाजवणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री टीना मुनीम या आज आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९५७ रोजी मुंबईत झाला होता. गुजराती कुटुंबात जन्मलेल्या टीना यांना लहानपणापासूनच ग्लॅमरस जगताचा भाग बनायचे होते. त्यांना सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ‘देस परदेस’ या चित्रपटाने त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी ‘लूटमार’, ‘मनपसंद’, ‘रॉकी’, ‘सौतन’ आणि ‘कर्ज’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. चला तर मग जाणून घेऊया टीना मुनीम यांच्या जीवनातील काही खास गोष्टींबद्दल…

अभिनेत्री बनायचे नव्हते
टीना यांनी १९७५ साली इंटरनेशनल टीन प्रिसेंस कॉन्टेस्ट, स्पेनमध्ये भारताकडून भाग घेतला होता. इथे त्यांनी ‘मिस फोटोजेनिक’ आणि ‘मिस बिकिनी’ पुरस्कार मिळाले होते. या कार्यक्रमामध्ये देव आनंद यांनी टीना यांना पहिल्यांदा पाहिले होते आणि त्यांना आपल्या ‘देस परदेस’ चित्रपटासाठी साईन केले होते. तरीही टीना खूप प्रयत्नांनंतर या चित्रपटात काम करण्यात तयार झाल्या होत्या. कारण त्यांना फॅशन डिझायनिंगमध्ये कारकीर्द घडवायची होती.

गुजराती जैन कुटुंबात जन्मलेल्या टीना यांचे खरे नाव निवृत्ती मुनीम हे आहे. टीना आपल्या १ भाऊ आणि ९ बहिणींमध्ये सर्वात लहान आहेत. टीना यांची मोठी बहीण भावना मॉडेलिंगमध्ये होत्या, त्यामुळे त्यांनाही मॉडेल बनायचे होते.

अशी झाली होती लव्ह लाईफची सुरुवात
सन १९८६ मध्ये टीना मुनीम यांची उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली होती. त्यांची प्रेम कहाणीने अनेक वळण घेतले. माध्यमांतील वृत्तानुसार, अनिल यांनी एका लग्न समारंभात पहिल्यांदा टीना यांना पाहिले होते. टीना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये लग्नात पोहोचल्या होत्या, ज्या अनिल यांना खूपच भावल्या होत्या. त्यांची टीना यांच्याशी भेट ही टीना यांचा भाचा करणमार्फत झाली होती. त्यावेळी टीना या बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार होत्या.

टीना यांनी अनिल अंबानींशी पहिल्या भेटीपर्यंत रिलायन्सबद्दल काहीच ऐकले नव्हते. तरीही, टीना यांचे असे म्हणणे आहे की, पहिल्या भेटीत अनिल त्यांना खूप आवडले होते.

कुटुंबाच्या दबावामुळे घेतला होता दूर होण्याचा निर्णय
अनिल अंबानी यांनी जेव्हा टीना यांच्याबद्दल आपल्या कुटुंबात सांगितले, तेव्हा ते या नात्याच्या विरोधात होते. त्यांना कोणतीही अभिनेत्री त्यांच्या कुटुंबाची सून म्हणून नको होती. कुटुंबाच्या दबावामुळे अनिल यांनी टीना यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा त्यांनी हा निर्णय टीना यांना सांगितला, तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तरीही, टीना यांना यामुळे खूप मोठा धक्का बसला होता.

भूकंपानंतर पुन्हा सुरू झाली चर्चा
सन १९८९ मध्ये अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये भूकंप आला होता. त्यावेळी टीना तिथेच होत्या. अनिल अंबानींनी सूत्रे हलवत टीना यांना फोन केला. फोनवर अनिल यांनी टीना यांना विचारले की, “तू ठीक आहेस ना?” यानंतर टीना यांचे उत्तर मिळताच इतर कोणतीच चर्चा केली नाही आणि फोन कट केला. अनिल यांच्या या वागणूकीमुळे टीना आश्चर्यचकीत झाल्या होत्या. टीना यांनाही राहवले नाही आणि दोघांमध्ये चर्चा सुरू झाली.

सन १९९१ मध्ये झाले लग्न
टीन आणि अनिल यांच्यात झालेल्या मुलाखतीमध्ये ते नेहमी आपल्या स्थानिक भाषेत म्हणजेच गुजरातीमध्ये बोलत असायचे. त्यानंतर कुुटुंबाच्या संमतीने सन १९९१ मध्ये अनिल यांनी टीना यांच्या लग्न केले. टीना आपले पती अनिल अंबानींपेक्षा २ वर्षे मोठ्या आहेत. त्यांचा जन्म १९५७ मध्ये झाला होता, तर अनिल अंबानींचा जन्म १९५९ साली झाला होता. टीना यांना अनमोल आणि अंशुल असे दोन मुले आहेत.

असे म्हटले जाते की, सन २००८ मध्ये टीना यांच्या वाढदिवशी अनिल अंबानींनी त्यांना लग्झरी याट (जहाज) भेट म्हणून दिली होती, ज्याचे नाव टियान होते. हे नाव अनिल आणि टीना नावाच्या आद्याक्षरावरून तयार झाले होते. टीना ज्येष्ठ व्यक्तींसाठी मुंबईमध्ये हार्मोनी फाऊंडेशन चालवतात.

अशाच प्रकारे त्या नवीन कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी हार्मोनी आर्ट फाऊंडेशन चालवतात. टीना या शॉपिंगसाठी अमेरिकेला जाणे पसंत करत नाहीत. त्यांच्या मते, त्या खूप खर्चिक आहेत, परंतु त्यांना जर आवडले तर ते पूर्ण मार्केटदेखील विकत घेऊ शकतात. त्यामुळे ते अशा ठिकाणी जाण्याचे टाळतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.