बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून आता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नावाची अधिकृत नोंद झाली आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्या प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती. या सर्व चर्चांना पुर्णविराम देत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ एप्रिलला मुंबईमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडला. मात्र जसा त्यांच्या लवस्टोरीचा गोड शेवट झाला तशी त्यांच्या प्रेमप्रकरणाचीही कहाणी खूपच मजेशीर आहे. पाहूया त्यांच्या प्रेमप्रकरणाचा हा माहित नसलेला किस्सा.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही सिने जगतातील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेऊन सुखद धक्का दिला होता. मात्र सध्या ते विवाह बंधनात अडकले असले तरी त्यांच्यात पहिल्या चित्रपटाच्यावेळी आलिया रणबीरसोबत काम करायला टाळाटाळ करत होती असा खुलासा खुद्द आलिया भट्टने केला होता.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नाआधी जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट करत होते. एकमेकांना डेट करण्यापूर्वीही आलियाने अनेकदा रणबीरवर क्रश असल्याचे कबूल केले होते. आलियाच्या म्हणण्यानुसार, त्यांची पहिली भेट संजय लीला भन्साळीच्या बालिका वधू या चित्रपटाच्या संदर्भात झाली होती आणि दोघेही त्यात कास्ट होणार होते. आलिया तेव्हा 12 वर्षांची होती, ती फोटोशूटसाठी रणबीरच्या खांद्यावर डोके ठेवण्यास टाळाटाळ करत होती. त्यावेळी रणबीर 20 वर्षांचा होता.
2014 मध्ये इम्तियाज अली दिग्दर्शित आलियाचा दुसरा चित्रपट ‘हायवे’ रिलीज होण्यापूर्वी दोघांनीही गप्पा मारल्या होत्या. यावेळी रणबीरने आलियाला “आलिया, प्रेमाबद्दल तुझे काय मत आहे? तुझ्यासाठी प्रेम किती महत्त्वाचे आहे? सध्या तू त्या मुलींपैकी आहेस का ज्या, नाही, मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे असे उत्तर देतात असा प्रश्न विचारला होता. यावर आलियाने , “नाही, मी असे म्हणत नाही. पण मी जे शोधत आहे मला ते अद्याप सापडले नाही. मी कधीच प्रेमात पडले नाही. मला किमान असे वाटत नाही. पण मला तशी आशा आहे.” असे मजेशीर उत्तर दिले होते.
त्यानंतर रणबीरने , “तू अशा व्यक्तीशी लग्न करशील का ज्याला तू अभिनय करू इच्छित नाही?” असाही प्रश्न आलियाला विचारला होता.आलियाने यावरही आपले स्पष्ट मत देताना “नाही. मी कदाचित आयुष्यभर अभिनय करणार नाही. पण मला पाहिजे तोपर्यंत अभिनय करायचा आहे आणि जर कोणाला मी तसे करू नये असे वाटत असेल तर त्याचा अर्थ त्यांना नको आहे. मी.” असे उत्तर दिले होते.
दरम्यान, रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या बहुचर्चित चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन अशा दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे.
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दिनानाथ मंगेशकर पुण्यतिथी | संगीत क्षेत्राला भारतरत्न देणाऱ्या अवलियाचा असा होता जीवनप्रवास
इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे अडकणार विवाह बंधनात, मेहेंदी आणि हळदीचा कार्यक्रम झाला थाटात पार