Wednesday, June 26, 2024

अभिनेत्री करीना कपूरसोबत करण जोहरला जायचय बिग बॉसच्या घरात, म्हणाला ‘कारण ती खूपच…’

प्रख्यात बाॅलिवूड निर्माता करण जोहर याचा अतिशय प्रतीक्षेत असलेला शो ‘काॅफी विथ करण’ गुरूवार (दि.७ जुलै ) पासून सुरू होणार आहे. याच शोमुळे करण मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. यातच त्याने सलमान खानचा शो ‘बिग बाॅस’मध्ये स्पर्धक होण्यासाठी एक अट समोर ठेवली आहे.

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत करणने ही अट सांगितली आहे. करणला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की, त्याला जर एका आठवड्यासाठी बिग बा्ॅसमध्ये जाण्याची संधी मिळाली, तर तो कोणत्या अभिनेत्रीला सोबत घेऊन जाईल?

या प्रश्नाचे उत्तर देत करण म्हणाला की, तो त्याच्या आवडत्या ‘पू’ म्हणजेच करीना कपूरला सोबत घेऊन जाऊ इच्छितो. करणने सांगितले की, करीना खूप मनोरंजक आहे आणि तिच्या सोबत त्याचे उत्तम बाॅंडिंग आहे. मुलाखतीच्या शेवटी करण म्हणाला की, तो बिग बा्ॅसमध्ये जाईल तर फक्त करीना सोबत नाही तर जाणारच नाही.

असो, काॅफी विथ करणच्या पहिल्या भागात करण सोबत पहिली काॅफी पिण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत, रणवीर सिंग आणि आलिया भट्ट.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा