Friday, July 5, 2024

आलिया भट्टने राहाचा पहिला वाढदिवस केला खास अंदाजात साजरा, दाखवली मुलीची झलक

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा एक वर्षाची झाली आहे. ६ नोव्हेंबरला आलियाने तिच्या मुलीचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला.आलिया भट्टने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये राहा तिच्या आई-वडिलांसोबत पूजा करत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये राहा केकसोबत खेळताना दिसत आहे. फोटो शेअर करताना आलियाने लिहिले- हॅपी बर्थडे बेबी टायगर. राहाच्या वाढदिवसाला आलिया आणि रणबीरच्या दोन्ही कुटुंबांनी हजेरी लावली होती. राहाची मावशी शाहीनने वाढदिवसाच्या केकचा फोटो शेअर केला आहे.

मुलगी राहाच्या वाढदिवसाला आलिया आणि रणबीरने खूप धमाल केली. आलिया-रणबीरचा फोटो व्हायरल होत आहे. राहाच्या वाढदिवसाला आजी नीतू कपूर आणि आजी सोनी राजदान यांनी खूप धमाल केली. नीतू कपूरने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे.

आलिया आणि रणबीरने राहाच्या वाढदिवसानिमित्त मीडियाला केक देखील दिला आणि मुलगा वाढदिवस त्यांच्यासोबत साजरा केला. त्यांचे फोटो देकील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा हिचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. आता राहाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी ते काम केले ज्याने माझा पाया मजबूत केला’, प्रियांकाने सांगितला तिचा बॉलिवूड प्रवास
‘सासर आणि माहेर एकाच ठिकाणी…’, भारती सिंगने पूर्ण केले तिचे सगळ्यात मोठे स्वप्न

 

हे देखील वाचा