बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळेच स्थान मिळवले आहे. ती जेवढी अभिनय क्षेत्रासाठी ओळखली जोते तेवढीच आपल्या वैयक्तीक आयुष्यासाठीही ओळखली जाते. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ या चित्रपटामधून केली होती. यामधून तिला अमाप प्रसिद्धी मिळाली. बुधवार (दि. 19 ऑक्टोंबर ) दिवशी तिला बॉलिवूड इंडस्ट्रामध्ये 10 वर्षे पुर्ण झाले आहेत.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात लहान अभिनेत्रींपैकी आलिया एक आहे. आलियाला यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळाला आहे, तिने आपल्या. तिने 19 ऑक्टोंबर 2012 मध्ये बॉलवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आता ती दिग्दर्शकाची पहिली पसंद मानली जाते. तिने इंडस्ट्रीमध्ये आपली 10 वर्ष पूर्ण केली आहेत त्यामुळे तिने सोशलमीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
आलियाने इंडस्ट्रीमध्ये आपले 10 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल तिने आपल्या अधिकृत इंस्टग्रामवर काही फोटो शेअर केले आहे ज्यामध्ये ती खूपच खुश दिसत आहे. तिने हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या आहेत, आणि फोटो शेअर करत असताना एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आज 10 वर्ष आणि प्रत्येकच दिवसासाठी मी खूपच आभारी आहे!!! मी अजून चांगली कलाकार बनण्याचा वाचन देत आहे. सखोल स्वप्न आणि जास्त परिश्रम!!!!! या मैजिकसाठी धन्यवाद, प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम.” आलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर धमाल करत आहे. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही तिच्या फोटोवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. वरुन धवन ते जान्हवी कपूरने आणि जोया अख्तरने तिच्या फोटोवर हार्टवाले एमोजी शेअर केले आहेत, सोबतच धर्मा प्रोडक्शननेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत लिहिले आहे की, गुलाबी ऑंखे जो तेरी देखी, दीवाने सगळे 10 वर्षापूर्वीच झाले होते! आमच्या शाइनिंग स्टूडेंटला शुभेच्छा!” आलिया भट्टचा स्टूडेंट ऑफ द ईयर हा चित्रपट धर्मा प्रोडक्शनद्वारा पोड्युस केली होती.
View this post on Instagram
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच हॉलिवूडमध्ये हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. याशिवाय तिच्याकडे बॉलिवूडमधील रानी की प्रेम कहानी आणि बैजू बावरा सारख्या दोन चित्रपटासाठी आलीयीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आलिया आपल्या लवरच आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
प्रियंका आणि अंकितची लव्हस्टोरी झाली सुरु; अभिनेत्री म्हणाली, ‘तुझ्याशी प्रेम करणं सोडून देऊ…’
ड्सिंग सेन्सवर ट्रोलर्सला कंगनाने शिकवला धडा; म्हणाली, ‘मी काय घातले पाहिजे काय नाही…’










