Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड कान्स चित्रपट महोत्सवात आलिया भट्टचे धमाकेदार पदार्पण, फुलांच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर झळकली

कान्स चित्रपट महोत्सवात आलिया भट्टचे धमाकेदार पदार्पण, फुलांच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर झळकली

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण अशा बातम्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे. २३ मे रोजी, आलियाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्लॉकबस्टर पदार्पण केले आहे. ती रेड कार्पेटवर झळकली. ती फुलांच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

कान्स चित्रपट महोत्सव १३ मे रोजी सुरू झाला आणि २४ मे पर्यंत चालेल. कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक भारतीय अभिनेत्रींनी आपली धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी आलिया भट्टने तिच्या सुंदर शैलीने सर्वांना थक्क केले. ती पीच रंगाच्या फ्लोरल डिझाइनच्या गाऊनमध्ये दिसली. आलियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर तिच्या लूकची एक झलकही शेअर केली आहे.

कान्समधील आलियाचा लूक समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने कान्समध्ये पदार्पणासाठी इटालियन डिझायनर एल्सा शियापरेलीने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायने नमस्ते म्हणत लोकांना शुभेच्छा दिल्या, तर आलिया भट्टनेही त्याच पद्धतीने लोकांना शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे त्यांनी भारतीय संस्कृतीची झलक सादर केली.

रेड कार्पेटवरील आलियाच्या स्टाईलने लोकांची मने जिंकली आहेत. या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपली उपस्थिती दाखवली आहे आणि तिने पहिल्याच उपस्थितीत धमाल केली आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, आलिया भट्ट लवकरच तिचा पती रणबीर कपूरसोबत ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

कान्समध्ये ‘होमबाउंड’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर जान्हवीने वडील बोनी कपूरला केले इग्नोर; जाणून घ्या कारण
काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ ५ जूनला उलगडणार ? ‘जारण’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

हे देखील वाचा