‘या’ गोष्टीवरून आलिया भट्टला बसला होता वडील महेश भट्टचा जोरात ओरडा, तर आईसोबत आजही होतात भांडणं


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) आयुष्यातील असे अनेक किस्से आहेत, जे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आलिया भट्ट प्रसिद्ध चित्रपट निर्माता महेश भट्ट यांची मुलगी आहे. एकदा तिने अनुपम खेर यांच्या शोमध्ये एक किस्सा शेअर करताना सांगितले होते की, तिला तिचे वडील महेश भट्ट यांनी एका गोष्टीसाठी खूप जोरात फटकारले होते.

आलिया भट्टने अनुपम खेर शोमध्ये सांगितले की, पप्पा महेश भट्ट यांनी तिला फटकारले होते, कारण ती एकदा एका खोटे बोलून रेस्टॉरंटमध्ये पार्टी करण्यासाठी गेली आणि उशिरा घरी आली होती. यासाठी तिला पप्पा महेश भट्ट खूप ओरडले होते. ते म्हणाले की, “जेव्हा तू अभिनय किंवा चित्रपटात येते, तेव्हा तुला तुझे काम गांभीर्याने घ्यावे लागते. कामाच्या दरम्यान ही जीवनशैली योग्य राहणार नाही.” (alia bhatt get scolded by mahesh bhatt for partying alia fights with her mother the anupam kher show)

पुढे अनुपम खेर यांनी आलियाला प्रश्न केला की, तिचे तिच्या आईसोबत कधी भांडण झाले आहे का? ज्यावर आलियाने उत्तर दिले की, त्यांच्यात दर दोन-तीन दिवसांनी भांडण होतच असतात. सोबतच आलिया भट्टने अनुपम खेरच्या शोमध्ये सांगितले की, ती तिच्या पालकांसोबत तिचे सिक्रेट्स शेअर करत नाही. ती तिच्या बहुतेक गोष्टी शाहीन भट्टला म्हणजेच तिच्या बहिणीला सांगत असते.

आलियाचे चित्रपट
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्रीचे सध्या बरेच चित्रपट लाइनमध्ये आहेत. आलिया ‘आरआरआर’, ‘ब्रह्मास्त्र’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. ती इतरही अनेक चित्रपटांसाठी शूटिंग करत आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!