Saturday, June 29, 2024

न सांगता फोटो काढल्यामुळे अभिनेत्री आलिया भट्ट भडकली, मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग करत लिहिले…

कलाकारांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, त्यांचे विविध फोटो टिपण्यासाठी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी मीडियामधील पापराझी हा गट काम करतो. या पापराझीमुळे कलाकारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचे खासगी आयुष्य खासगी राहातच नाही. आता याच पापाराझीवर आलिया भट्टने तिचा रोष व्यक्त केला आहे. आई झाल्यानंतर बहुतकरून आपल्या मुलीसोबत वेळ घालवणारी आलिया सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय झाली आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया चांगलीच लाइमलाईट्मधे आली होती. मात्र तिचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आलियाने तिच्या आजूबाजूला अशा लोकांना पाहिले, जे तिची परवानगी न घेता फोटो काढत होते. याबद्दलच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

झाले असे की, आलिया भट्टचे काही फोटो एका मोठ्या न्यूज पोर्टलने त्यांच्या साइटवर प्रकाशित केले. त्या फोटोमध्ये आलिया तिच्या बांद्रा येथील घरात लिविंग एरियामध्ये बसलेली दिसत आहे. अलियायाने हेच फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केले आणि रोष व्यक्त करत लिहिले, “तुम्ही माझ्यासोबत मजाक करत आहात का? ही एक नेहमीसारखी सामान्य दुपार होती, जेव्हा मी माझ्या घराच्या लिविंग एरियामध्ये बसलेली होती. तेव्हाच मला जाणवले की कोणीतरी मला बघत आहे. जसे मी वर पाहिले, मला दोन माणसं दिसली जी माझ्या घराच्या शेजारी असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर कॅमेरा घेऊन उभी होती. हे असे करणे योग्य आहे का? असे करण्याची परवानगी मिळू शकते? हे कोणाच्या खासगी आयुष्याचे हनन नाही का? तुमच्यात आणि माझ्यात एक रेष होती जी तुम्ही आज ओलांडली आहे.” आलियाने ही पोस्ट मुंबई पोलिसांना देखील टॅग केली आहे. आता यावर मुंबई पोलीस किंवा अलीकडून पुढे काय कृती घडते ते पहाणे महत्वाचे असेल.

तत्पूर्वी आलियाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात दिसणार आहे. सध्या ती तिचे मदरहूड एन्जॉय करत तिच्या मुलीला वेळ देताना दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा