Monday, June 24, 2024

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

साऊथचा सुपरस्टार राम चरण कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असताे. एकीकडे अभिनेता लवकरच वडील होणार आहे, तर दुसरीकडे त्याचा ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्कर 2023 च्या पुरस्कारासाठी सामील आहे. अशा स्थितीत राम चरण चर्चेत राहणे निश्चितच. दरम्यान, अभिनेता नुकताच विमानतळावर स्पॉट झाला आहे, पण यावेळी सुपरस्टारच्या एका गाेष्टीने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे ती गाेष्ट? चला जाणून घेऊया…

राम चरण (ram charan) नुकताच अमेरिकेत ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी जाताना दिसला. अशात अभिनेता हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाला, परंतु यात विशेष म्हणजे राम चरण अनवाणी पायाने चालत होता. जे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक हैराण झाले. मात्र, राम चरण असे अनवाणी पायांनी चालण्यामागे एक खास कारण आहे. काय आहे ते कारण? चला जाणून घेऊया…

48 दिवस अनवाणी पायांने चालणार अभिनेता?
खरे तर, राम चरण दरवर्षी अयप्पा दीक्षा घेतो. केरळमधील सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला हा विधी पाळावा लागतो. तसेच भाविकांना 48 दिवस उपवास करण्यास सांगितले जाते. अशात यावेळी राम चरणने अयप्पा दीक्षा घेतली आहे, त्यामुळे अभिनेत्याला 48 दिवस अनवाणी पायाने राहावे लागणार आहे. अभिनेता दरवर्षी हे विधी पाळताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

12 मार्चला हाेणार ऑस्कर 2023 पुरस्कार
‘आरआरआर’ मधील ‘नाटू नाटू’ हे गाणं ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये नामांकित झाले आहे. हा पुरस्कार 12 मार्च रोजी अमेरिकेत होणार आहे. याव्यितरिक्त राम चरण याच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले ,तर त्याने ‘जंजीर’, ‘नायक’, ‘आरसी 15’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(tollywood actor ram charan rrr spotted walking barefoot at hyderabad airport us ahead of oscars 2023 viral video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘खतरों के खिलाडी 13’मध्ये उर्फीची एन्ट्री झाली निश्चित? पण ‘बिग बाॅस16’च्या या स्पर्धकाने नाकारली ऑफर

‘सोनू निगम’सोबत झालेल्या भांडणावर स्वप्नीलच्या बहिणीचा मोठा खुलासा, सांगितले घटनेचे सत्य

हे देखील वाचा