Monday, July 1, 2024

आलिया भट्टने पाहिला सिद्धार्थ अन् कियाराचा ‘शेरशाह’, म्हणाली, ‘तू खूपच खास होतास….’

यामागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा आणि प्रेक्षकांच्या मनात अधिकाधिक उत्साह निर्माण करणारा सिनेमा ‘शेरशाह’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांची भूमिका असलेला हा सिनेमा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा यांची सत्य कथा पडद्यावर उतरवणाऱ्या या सिनेमाचे समीक्षकांनी आणि कलाकारांनी देखील खूपच कौतुक केले आहे.

या चित्रपटाबद्दलच्या भावना प्रेक्षक, कलाकार, फॅन्स सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री आलिया भट्टने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चित्रपटाचे आणि खास करून सिद्धार्थचे कौतुक केले आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. सिद्धार्थची कथित एक्स गर्लफ्रेंड असलेल्या आलियाने त्याच्या या भूमिकेचे विशेष कौतुक केले आहे. (Alia bhatt praised the film shershaah and siddharth malhotra)

आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटले, “नक्की, नक्की, नक्की बघा, या चित्रपटाने मला हसवले, रडवले आणि सर्व काही. सिद्धार्थ तू खरंच खूप खास होतास. तसेच कियारा माझी सुंदरी, तू संपूर्ण चित्रपटात चमकली आहेस. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आणि कलाकरांना खूप खूप शुभेच्छा. खूपच सुंदर सिनेमा आहे.”

आलियासोबत अनेक इतर कलाकारांनी देखील सिनेमाचे तोंडभरून कौतुक केले आहे. शिवाय प्रेक्षकांनी सुद्धा सिद्धार्थ आणि कियारा यांच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या मित्र परिवाराने जवळच्या लोकांनी त्यांचे कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ मल्होत्राने सोशल मीडियावर विक्रम बत्रा यांच्यासोबत इतर शाहिद सैनिक बांधवांना श्रद्धांजली देताना एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले, “कॅप्टन विक्रम बत्रा आणि दिल्लीमधील सर्व सैनिक वीरांना माझा नमस्कार. ज्या प्रेमाने आणि उत्साहाने ते त्यांच्या कुटुंबाला युद्धाच्या वेळेस पत्र लिहितात, ती खरंच एक असामान्य अशी भावना आहे. त्यामुळेच सैनिक तयार होतात. जेव्हा मी माझे हे पत्र वाचले, तेव्हा मी माझ्या डोळ्यासमोर विक्रम यांना पाहू शकत होतो. फक्त विक्रमच नाही, तर कारगिल युद्धात निधन पावणाऱ्या ५२७ सैनिकांनी ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत त्यांचे जीवन जगले. आज आपण त्या सर्वांची आठवण आपल्या मनात त्यांच्याबद्दल अभिमान भरूया. जय हिंद. ७५ व्या स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात कप्तान विक्रम मल्होत्रा यांची भूमिका इतकी हुबेहूब वठवली आहे की, विक्रम यांच्या आई-वडिलांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. कारगिल युद्धात विजय मिळवून देण्यात कॅप्टन विक्रम यांनी सिंहाचा वाट उचलला होता. एकीकडे आपण विजय तर मिळवला मात्र दुर्दैवाने विक्रम बत्रा यांना या विजयासाठी त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली. हा संपूर्ण सिनेमा बघणाऱ्यांच्या मनात नक्कीच चर्रर्रर्र करून जाईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा