आलिया भट्ट म्हणजे बॉलिवूडमधील क्यूट, बबली आणि दमदार अभिनेत्री आहे. आलियाने हायवे, उडता पंजाब, राझी, डिअर जिंदगी आदी हिट सिनेमातून भूमिका साकारत ती किती ताकदीची अभिनेत्री आहे हे सिद्ध केले आहे. आलिया भट्ट नेहमीच तिच्या चित्रपटांसोबतच खाजगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
आलिया आणि रणबीर कपूर यांच्या नात्याबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. चित्रपटाचं स्क्रीनिंग, एखाद्या सेलिब्रिटीची पार्टी, कौटुंबीक कार्यक्रम, हॉलिडे, शूटिंग, अवॉर्ड फंक्शन अशा अनेक ठिकाणी ही जोडी सोबत दिसते. जवळपास दोन वर्षांपासून ही दोघे रिलेशनशिप मध्ये आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन सुरु झाला असून, अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकत आहे. त्यामुळे साहजिकच बॉलिवूडचे हॉट कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाबद्दल देखील चर्चाना पुन्हा सुरुवात झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हे स्वीट कपल २०२० सालच्या सुरुवातीलाच लग्न करणार होते, मात्र कोरोनामुळे हे शक्य झाले नाही. आता एकीकडे कोरोना हळूहळू आटोक्यात येत आहे आणि सगळीकडेच लग्नांचा बहर आलेला आहे त्यामुळे पुन्हा रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरायला सुरुवात केली.
मात्र या सर्व चर्चांना आलियाने नुकताच पूर्णविराम दिला. आलिया एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना म्हणाली, यावेळी आलिया म्हणाली, ” मला सर्व जण सर्व ठिकाणी हाच प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. मीडियामध्ये येणाऱ्या माझ्या लग्नाच्या बातम्या ह्या निव्वळ अफवा आहेत. मी लग्नाचे प्लँनिंग जरी करत असले तरी, मी आता लग्न नक्कीच करणार नाहीये. मी आता फक्त २५ वर्षांची आहे. मला वाटते इतक्या लवकर लग्न करणे म्हणजे घाई होईल. सध्या मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून, इतक्यात माझा लग्नाचा कोणताच विचार नाहीये.” आता आलियानेच सांगून टाकल्यावर तिच्या लग्नाच्या येणाऱ्या बातम्या ह्या फक्त अफवाच आहेत म्हणल्यावर विषयच संपला.
आजच्या घडीला आलियाच्या हातात अनेक मोठे सिनेमे आहेत. आलिया आणि रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या सिनेमात एकत्र काम करत आहे. या सिनेमात या दोघांसोबतच अमिताभ बच्चन देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय आलिया संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमातही दिसणार आहे.