वाढदिवसाचे औचित्य साधून आलियाने शेअर केला अशा चित्रपटाचा पोस्टर, जो मोडू शकतो कमाईचे सर्व विक्रम


आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने सेनेप्रेमींना आपल्या प्रेमात पडणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आपल्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोमुळे ती नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालत असते. अगदी कमी कालावधीत तिने चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. आलियाचा जन्म 15 मार्च 1993 मध्ये मुंबई येथे झाला. तिने ‘स्टूडेंट ऑफ द इअर’ मधून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. आज आलियाचा वाढदिवस आहे आणि या दिवशी तिने तिच्या फॅन्सला एक सरप्राइज दिले आहे. तीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची झलक दाखवली आहे.

आलिया भट्टच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक बाहुबली फेम ‘एसएम राजामौली’ हे आहेत. या चित्रपटातून आलिया तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आपल्या वाढदिवशी या चित्रपटातील आपला सिता या पात्राचा परियच तिने करून दिला आहे.

तिच्या या चित्रपटासाठी ती खूप उत्साहित आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोत ती एका ब्लॅक शेडेड जागेवर बसलेली आहे. त्या फोटोला बघून असं वाटतं आहे की, ती एका मंदिरात बसलेली आहे. मागे श्रीराम प्रभूंची मूर्ती देखील दिसत आहे.

चित्रपटातील या फोटोला शेअर करत आलियाने असे लिहले आहे की,” तिचा पूर्ण लूक उद्या शेअर केला जाईल. या चित्रपटात आलिया सोबत ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि राम चरण हे देखील महत्वाची भूमिका निभावणार आहे. असं म्हटलं जातंय की, हा एक पिरियड ड्रामा चित्रपट असणार आहे, ज्यात सगळे कलाकार पहिल्यांदाच एकच स्क्रीनवर दिसणार आहे. या चित्रपटाला 10 भाषांमध्ये प्रदर्शित केले जाणार आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोंबर 2021ला चित्रपटातगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने हाय वे, उडता पंजाब, राझी, गल्ली बॉय, डियर जिंदगी, बद्री की दुल्हनियाँ या चित्रपटात काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.