80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. असाच ‘श्रीकृष्णा’ या मालीकेतील राधाची भुमिका गाजली. आजही ही भुमिका प्रेक्षकांच्या मनात आहे.
‘श्रीकृष्णा’ या मालिकेत लहान राधाची भूमिका साकारणाऱ्या श्वेता (shweta)रस्तोगीने तिच्या निरागसतेने आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यावेळी तिची स्वप्निल जोशी सोबतची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री खूप लोकप्रिय होती. अगदी लहान वयातच, श्वेताने स्वतःला तिच्या काळातील सर्वात गोंडस राधा म्हणून स्थापित केले. या 33 वर्षांच्या प्रवासात श्वेताच्या रूपाने पूर्णपणे कायापालट झाला आहे. आता ती एका मोहक आणि परिपक्व रूपात दिसत असल्याने, तिला पहिल्या नजरेत ओळखणे कठीण आहे. आणि आता तिने टेलिव्हिजन आणि रंगभूमीवरील आपले काम सुरूच ठेवले आहे.
श्वेता रस्तोगीने ‘केसर’, ‘वो रहने वाली महालों की’ आणि ‘स्त्री शक्ती’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच ती ‘बालवीर’, ‘देवों के देव महादेव’, ‘सिया के राम’, ‘जय हनुमान’, ‘अलिफ लैला’, ‘श्री गणेश’ आणि ‘जप तप व्रत’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसली. तर या मालिका मध्ये काम करुन आपली ओळख निर्माण केली आहे. तर ही अभिनेत्री सध्या सोशल मिडीयावरही सक्रिय असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










