Saturday, July 6, 2024

जोरात धावत विमानतळावर कोणाला शोधत होती आलिया भट्ट? झाली कॅमेऱ्यात कैद

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत आहे. तिच्याबद्दल सतत काही ना काही अपडेट किंवा बातमी समोर येत असते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या चर्चा रंगतात. अशातच आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी चर्चेचे कारण तिचे लग्न किंवा चित्रपट नाही, तर दुसरेच काहीतरी आहे.

खरं तर, दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल टर्मिनल ३ येथे अचानक अभिनेत्री आलिया भट्टला ट्रॉली घेऊन पळताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (alia bhatt shooting seen for karan johar films rocky aur rani ki prem kahani at delhi airport goes viral)

व्हिडिओमध्ये आलियाने ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती काळी पँट, काळा शर्ट आणि काळे जॅकेट घातलेली दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये आलियासोबत करण जोहरही (Karan Johar) दिसत आहे. खरं तर, आलिया इतर कोणत्याही देशातून किंवा शहरातून दिल्ली विमानतळावर उतरली नाही. तर तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा एक सीन याठिकाणी शूट करण्यात आला आहे.

या सीनमध्ये आलिया धावत येत, कोणालातरी शोधताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर करत आहे. दिल्ली विमानतळाव्यतिरिक्त कुतुबमिनारचा सीनही शूट करण्यात आला आहे, ज्याचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

‘रॉकी और रानीकी प्रेमकथा’ असे या चित्रपटाचे नाव असून यात आलियाशिवाय रणवीर सिंग (Ranveer Singh), धर्मेंद्र (Dharmendra), जया बच्चन (Jaya Bachchan) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) दिसणार आहेत. करण जोहर दिग्दर्शित ही प्रेमकथा इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी लिहिली आहे. हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी म्हणजेच पुढच्या वर्षी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा