×

‘लग्न झालंय का चित्रपटाचं शूटिंग?’, सिंदूर अन् मंगळसूत्राविना आलिया भट्टला पाहून भडकले युजर्स

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. प्रदीर्घ नात्यानंतर अखेर या महिन्यात अभिनेत्रीने तिचा प्रियकर अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नगाठ बांधली. लग्नानंतर लगेचच आता हे नवविवाहित जोडपे आपापल्या कामात व्यस्त झाले आहे. अशातच, अभिनेत्री बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) तिचा आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’मध्ये व्यस्त झाली आहे.

अभिनेत्री तिच्या शूटिंगसाठी बाहेर गेली होती. शूटिंग संपवून मुंबईत परतलेल्या आलियाला नुकतेच पॅपराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यादरम्यान आलियाने जबरदस्त पोझ देत फोटो क्लिक करून घेतले. अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला पाहून नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. खरं तर, यावेळी आलिया सिंदूर आणि मंगळसूत्राच्या विना दिसली. (alia bhatt get brutally trolled for not wearing sindoor and mangalsutra)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतेच लग्न झालेल्या नवरीला असे पाहून सोशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करत आहेत. समोर आलेल्या फुटेजमध्ये अभिनेत्री मुंबई विमानतळावर ब्लॅक टी शर्ट आणि जीन्समध्ये दिसली. मात्र यावेळी अभिनेत्रीने ना मंगळसूत्र घातले होते ना सिंदूर लावला होता. अशा परिस्थितीत संतप्त चाहत्यांनी आलियावर बरीच टीका केली. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, “त्यांचे लग्न झाले आहे की, एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते.” त्याचवेळी दुसर्‍या युजरने लिहिले, “कोणी म्हणेल की ही नववधू आहे?”

त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर दोघांनी १४ एप्रिल रोजी लग्न केले. केवळ कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवाय दोघे लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post