Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड आलिया भट्ट, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट या मायलेकींची मालदीवमध्ये फुल टू धमाल

आलिया भट्ट, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट या मायलेकींची मालदीवमध्ये फुल टू धमाल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांबरोबर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आलिया भट्ट, सोनी राजदान आणि शाहीन भट्ट या तिघीनीं कामाच्या व्यापातून ब्रेक घेत विश्रांतीसाठी त्या मालदीवमध्ये सुट्टी घालवण्यासाठी पोहचल्या आहेत. आलियाने तिच्या ट्रीपमधील फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सोनी राजदान यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात या मायलेकी मालदीवमध्ये मजा करताना दिसत आहेत. इंस्टाग्राम रीलमध्ये फोटो आणि व्हिडिओ वापरण्यात आले आहेत. मावळत्या सूर्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक फोटो आणि व्हिडिओ रीलमध्ये दिसत आहेत. आलिया भट्टची आईसुद्धा रीलमध्ये समुद्रावर फिरताना दिसत आहे.

आलिया तिच्या कुटुंबासोबत मजा करत आहे. याआधी आलिया तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत राजस्थानमध्ये रणबीरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, हे कपल जोधपूरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये थांबले होते. रणबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांनी भरपूर वेळ एकत्र वेळ घालवला. काही दिवसांपूर्वी आलियाने रणबीरसोबत आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझ्या आयुष्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर आलिया आजकाल तिच्या प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यस्त आहे. गेल्या काही दिवसात ती अनेकवेळा मुंबईतील डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसली आहे. मात्र, आगामी काळात तिचा कोणता चित्रपट प्रदर्शित होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावेळी आलियाकडे अनेक चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. ज्यात ‘आरआरआर’, ‘डार्लिंग्स’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. आलिया भट्टने प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्याचे नाव ‘जी ले जरा’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहेत.

दैनिक बोंबाबोंमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुझी माझी जोडी जमली’, गाण्यावर मानसीने पतीसोबत धरला ठेका; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’

-पिवळ्या रंगाच्या साडीत मितालीने दिल्या झक्कास पोझ; चाहताही म्हणाला, ‘खूप खूप जास्त सुंदर दिसताय’

-‘…खरचं साडीपेक्षा तू जास्त सुंदर दिसतेस’, श्रुती मराठेच्या फोटोवरील चाहत्यांची कमेंट ठरतेय लक्षवेधी

हे देखील वाचा