Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग लवकरच सुरू होणार? आलिया भट्ट पोहचली संजय लीला भन्साळी यांच्या घरी

‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग लवकरच सुरू होणार? आलिया भट्ट पोहचली संजय लीला भन्साळी यांच्या घरी

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. अशातच आलिया भट्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी जाताना दिसली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आलियाला संजयच्या घरी पाहिल्यानंतर ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

आलिया आणि रणबीर कपूरची जोडी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटादरम्यान चाहत्यांनी आलिया आणि रणबीरला पाहिले आहे. या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. आता आलिया संजय लीला भन्साळी यांच्या घरी दिसल्याने चाहत्यांना वाटते की ती लवकरच ‘लव्ह अँड वॉर’चे शूटिंग सुरू करणार आहे. आलियाचे आणखी धमाकेदार चित्रपट पाहायला मिळतील यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होऊ शकते. शुक्रवारी दुपारी बॉलिवूमीडिया रिपोर्ट्सनुसार, ड अभिनेत्री आलिया भट्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या मुंबईतील घराबाहेर दिसली. यादरम्यान आलिया पापाराझींना टाळताना दिसली आणि फोटोग्राफर्सना पोजही दिली नाही.

आलिया तिचा पती आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘लव्ह अँड वॉर’मध्ये पुन्हा दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरशिवाय विकी कौशलही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीदरम्यान आलिया ‘लव्ह अँड वॉर’ आणि रणबीरसोबत पुन्हा काम करण्याबाबत बोलली होती. आलिया म्हणाली, “प्रेक्षक म्हणून, भन्साळी आणि रणबीरला इतक्या वर्षांनंतर एकत्र काम करताना पाहून मी खूप उत्साहित आहे. मला आश्चर्य वाटते, ते कसे असेल?” विकी कौशलसोबत काम करताना आलिया म्हणाली होती, “विकी आणि मी पुन्हा एकत्र येत आहोत (दोघांनी ‘राझी’ चित्रपटात एकत्र काम केले होते). रणबीर आणि विकीने ‘संजू’ चित्रपटात एकत्र काम केले होते.

सध्या आलिया तिच्या आगामी स्पाय युनिव्हर्स चित्रपट ‘अल्फा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया ‘अल्फा’ चित्रपटासाठी बॉबी देओलसोबत ॲक्शन सीनचे शूटिंग करत आहे. आलिया आणि चित्रपटाचा खलनायक बॉबी देओल सध्या मुंबईत आहेत, जिथे ते फिल्मसिटीमध्ये कडक सुरक्षेत चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. आलिया भट्ट लवकरच वेदांग रैनासोबत ‘जिगरा’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फराह खानवर कोसळला दुःखाचा डोंगर; आईने घेतला वयाच्या 79 व्या वर्षी शेवटचा श्वास
गरोदरपणामुळे दीपिकाने नाकारली आंतरराष्ट्रीय सिरीज? सत्यता आली समोर

हे देखील वाचा