Friday, July 5, 2024

आलू विथ अल्लू केव्हा? आलिया भट्टला करायचे आहे ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम

दाक्षिणात्य चित्रपट हे बॉलिवूडवर देखील भारी पडणारे ठरतात हे तर सर्वश्रुत आहे. अनेक साऊथच्या चित्रपटांनी बॉलिवूडपटाना जोरदार टक्कर दिली आहे. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा: द राइज़’ (Pushpa: The Rise) सिनेमाचेच घ्या. हा सिनेमा जसा प्रदर्शित झाला तसा मोठ्या स्वरूपात चर्चेत आला आहे. सिनेमाची कमाई दिवसेंदिवस कोटीच्या कोटी उड्डाणे घेत नवनवीन रेकॉर्ड रचत आहे. या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडली आहे. या सिनेमातील गाणी, संवाद, अल्लू अर्जुनाचा अंदाज, रश्मिका आदी अनेक गोष्टींची भुरळ प्रेक्षकांना पडली. या सिनेमाची क्रेझ पाहून बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना आता अल्लू अर्जुनसोबत काम करायची इच्छा निर्माण झाली आहे. याच यादीतील एक मोठे नाव म्हणजे, आलिया भट्ट. आलियाने नुकतेच अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

‘पुष्पा: द राइज़’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसिसवर बक्कळ कमाई करत या चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मागे टाकत कमाईचे आणि यशाचे शिखर गाठले आहे. या सिनेमाने अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख दिली असून, त्याच्या डान्सने आणि त्याच्या स्टाईलने सर्वच अभिनेत्री प्रभावित झाल्या आहेत. बॉलिवूडमधील बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रतिभावान अभिनेत्री असलेल्या आलियाने नुकतेच अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची तिची इच्छा बोलून दाखवली आहे.

आलियाने सांगितले की, “मी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाने ‘पुष्पा’ सिनेमा पहिला आणि आम्ही सर्वच त्याचे फॅन झाले आहोत. माझ्या घरातील लोकं मला विचारत आहे की, मी त्याच्यासोबत काम कधी करणार. मला घरी आलू म्हटले जाते. ते मला विचारत आहे की, आलू तू अल्लूसोबत कधी काम करणार? जर मला अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला सर्वात जास्त आनंद होईल.

‘पुष्पा: द राइज़’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन तब्बल ५० दिवसांपेक्षा अधिक काळ झाला असला, तरी या सिनेमाची क्रेझ आणि कमाई बॉक्स ऑफिसवर अविरत सुरु आहे. अजूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. या सिनेमाला अधिकृतपणे ब्लॉकबस्टर जाहीर करण्यात आले असून, या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. २०२१ वर्षातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून ‘पुष्पा: द राइज़’ सिनेमा ठरला आहे.

alia and allu
Photo Courtesy: Instagram/alluarjunonline,aliaabhatt

आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच ‘गंगूबाई काठियावाड़ी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमात दिसणार असून, या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यात आलिया पहिल्यांदा लेडी डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा-

शाॅकिंग! प्रसिद्ध गायिकेचा रहस्यमय मृत्यू, घरातच आढळलाय मृतदेह

लता मंगेशकर यांच्यासाठी ‘हे’ गाणे होते खूपच कठीण, मात्र एसपी बालसुब्रमण्यम यांच्या मदतीमुळे गाणे झाले सुकर

अभिनेत्यापुर्वी अभियंता होता आत्माराम भिडे; केवळ अभिनयासाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी

हे देखील वाचा