Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्यावर कारवाई करण्यात येणार , AICWA ने दिली माहिती

समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्यावर कारवाई करण्यात येणार , AICWA ने दिली माहिती

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ आणि युट्यूबर रणवीर इलाहाबादिया यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे आणि त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. असोसिएशनने रणवीर इलाहाबादिया यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणीही केली. सोमवारी, असोसिएशनने म्हटले की इलाहाबादिया यांचे भाष्य आक्षेपार्ह आणि सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांच्या विरोधात आहे. असोसिएशनने भारतीय चित्रपट उद्योगाला शोमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने म्हटले आहे की, “समय रैना यांनी आयोजित केलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये केलेल्या निंदनीय आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांचा ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन तीव्र निषेध करते. अलिकडच्याच एका भागात, शोमधील सहभागी रणवीर इलाहाबादिया यांनी घृणास्पद विधाने केली आहेत जी आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांना अत्यंत अपमानजनक आहेत. अशी सामग्री अजिबात स्वीकार्य नाही आणि आपल्या समाजाच्या नैतिकतेसाठी एक मोठा धोका आहे.”

असोसिएशनने पुढे म्हटले आहे की, “संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधित्व करत, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन इंडियाज गॉट टॅलेंटवर अधिकृतपणे बहिष्कार घालते. आम्ही सर्व कलाकार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांना या शोमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींशी, ज्यात होस्ट समय रैना आणि रणवीर इलाहाबादिया यांचा समावेश आहे, त्वरित कोणताही संबंध थांबवण्याचे आवाहन करतो. या व्यक्तींना यापुढे भारतीय चित्रपट उद्योगाकडून कोणताही पाठिंबा मिळणार नाही.”

दोघांवरील बंदी व्यतिरिक्त, असोसिएशनने रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई, सर्व जबाबदार व्यक्तींविरुद्ध एफआयआर आणि अशाच प्रकारच्या घटना रोखण्यासाठी डिजिटल सामग्रीसाठी कठोर नियमांची मागणी केली आहे.

स्टँड-अप कॉमेडियन समय रैना ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ नावाचा एक शो चालवतो. या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील परीक्षकांना आमंत्रित केले आहे, ते स्पर्धकांचे परीक्षण करतात आणि त्यांच्यावर भाष्य देखील करतात. अलीकडेच, समय रैनाच्या शोमध्ये जज म्हणून आलेल्या युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने एक वादग्रस्त आणि अश्लील टिप्पणी केली. यानंतर, सोशल मीडियावर लोक त्याच्याविरुद्ध बोलू लागले. पोलिसांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

संजय दत्तच्या एका चाहत्याने अभिनेत्याच्या नावे केली ७२ कोटींची संपत्ती; महिला चाहतीचा वेडेपणा…
२१५ अभिनेत्रींनी ऑडिशन दिल्यानंतर या पाकिस्तानी अभिनेत्रीला केले होते कास्ट; सनम तेरी कसम विषयी हे माहित आहे का …

हे देखील वाचा