Wednesday, February 21, 2024

एवढी लोकप्रिय अभिनेत्री, तरीही प्रीतीने वयाने १० वर्षांनी लहान व्यक्तीशी केले होते लपूनछपून लग्न

अभिनेत्री प्रीती झिंटा बॉलीवूडमध्ये डिंपल गर्ल म्हणून ओळखली जाते. गालावर पडणाऱ्या खळीमुळेल प्रीतीचे सौंदर्य अधिकच उठून दिसते. प्रीतीच्या अभिनय व सौदर्याचे अनेक चाहते आहे. नुकताच प्रीतीने आपला ४६ वा वाढदिवस साजरा केला. एका उक्तृष्ट अनिभेत्रीबरोबर प्रीती एक बिझनेस वुमनदेखील आहे.

चला तर मंडळी आज आपण एकेवेळी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेल्या अभिनेत्री प्रीती झिंटाबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.

४६ वर्षीय प्रीतीचा जन्म ३१ जानेवारी १९७५  रोजी हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे झाला. प्रीतीच्या वडिलांचे नाव दुर्गानंद झिंटा आणि आईच नाव नीलप्रभा. तिचे वडील हे भारतीय आर्मीमध्ये ऑफिसर होते. प्रीतीचे शालेय शिक्षण शिमला मधील कॉन्व्हेन्ट ऑफ जीसास आणि मॅरी स्कूल येथे झाले आहे. त्यानंतरच शिक्षण तिने शिमल्यातीलच सेंट बेडे कॉलेज इथून पूर्ण केलं. प्रीतीने तिचे ग्रॅज्युएशन इंग्लिश ऑनर्स आणि पोस्ट ग्रॅज्युएशन क्रिमिनल सायकॉलॉजी मधून पूर्ण केले आहे. प्रीतीचं नावं बॉलिवूड मधील सर्वात शिकलेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्यं येतं.

प्रीती जेव्हा 13 वर्षाची होती तेव्हा तिच्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघात तिच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. या अपघातात तिची आईदेखील गाडीत होती, परंतू त्या जखमी झाल्या व सुदैवाने अपघातून वाचल्या. त्या धक्क्यातून सावरायला तिच्या आईला जवळपास 2 वर्ष लागले. या घटनेचा प्रीतीवरही खूप परिणाम झाला आणि त्यानंतर तिच्या आयुष्याने एक वेगळच वळण घेतलं. परिस्थिती माणसाला त्याचा वयापेक्षा देखील मोठे अर्थात प्रगल्भ बनवते, आणि याच उक्तीप्रमाणे प्रीती या घटनेनंतर 13 वर्षांची असतानाच बऱ्यापैकी समंजस झाली होती.

१९९६ मध्ये एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तिची भेट एका दिग्दर्शकाबरोबर झाली होती. त्या दिग्दर्शकाने प्रीतीला एका चॉकलेटच्या कमर्शियल जाहीरातीमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर प्रीतीने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. १९९७ मध्ये एका ऑडिशनमध्ये प्रीतीला शेखर कपूर यांनी पाहिले आणि अभिनेत्री बनण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रितीने १९९८ मध्ये शाहरुख खानसोबत ‘दिल से’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या करिअरची गाडी खऱ्या अर्थाने रुळावर आली. जेव्हा तीने आपला पहिला सिनेमा केला, तेव्हा तीचे वय जेमतेम २३ वर्ष होते.

प्रीतीने तिच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अमेरिकेतील जिनगुड इफन यांच्या सोबत लग्न केलं. २९ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रीती आणि जीन यांनी अमेरिकेतील लॉस एंजीलास इथे सात फेरे घेऊन आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरवात केली . लग्नाच्या जवळपास 6 महिन्यानंतर त्यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. प्रीतीचे नाव आधी बिझीनेसमन नेस वाफिया यांच्यासोबत जोडलं जात होतं, परंतु या दोघांच्या नात्याचा शेवट आयपीएलच्या एका हंगामादरम्यान झाला.

वाचा- जेव्हा भले भले सुपरस्टार मागे लपत होते, तेव्हा प्रीतीने अंडरवर्ल्ड डॉनविरूद्ध दिली होती साक्ष

शाहरुख सोबत काम केलेली ही बालकलाकार सांगतेय अभिनयापासून दूर जाण्याचं कारण

हे देखील वाचा