Friday, July 5, 2024

…म्हणून अल्लू अर्जुनमुळे इलियाना डिक्रुझ झाली होती रुग्णालयात भर्ती, जाणून घ्या संपूर्ण किस्सा

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाचा जलवा आजही डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनने त्याचे पात्र अगदी मजेशीर पद्धतीने निभावले आहे. त्याच्याबाबत अनेक किस्से आपल्याला माहित आहेत. परंतु आज आपण अशा एका किस्साबद्दल जाणून घेणार आहेत ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसेल जेव्हा अल्लू अर्जुनमुळे इलियाना डिक्रुझ हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती.

नुकतेच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ‘डेंजरस खिलाडी’ या हिंदी डब चित्रपटातील आहे. या व्हिडिओची सुरुवात हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या इलियानापासून होते. तेव्हा एका बाईला समजते की, तिची ही हालत तिचा पती अल्लू अर्जुनमुळे झाली आहे. (Allu Arjun and Ileana D’Cruz comedy scene from movie, watch video)

या व्हिडिओमध्ये दाक्षिणात्य अभिनेता राजेंद्र प्रसाद कमिश्नरच्या पात्राता दिसत आहे. जेव्हा तो इलियाना जवळ जातो आणि मोठमोठ्या गप्पा मारायला लागतो तेव्हा ती त्याला जोरदार कानाखाली देते. यानंतर अल्लू अर्जुन आत जातो आणि दोन वेळा कानाखाली मारल्याचा आवाज बाहेर येतो. यानंतर कमिश्नर दोन्ही गालांवर हात ठेऊन बाहेर पडतो. पुढे या सीनमध्ये खूपच मजेशीर किस्सा दाखवला आहे.

अल्लू अर्जुनच्या चित्रपटांपैकी त्याचा बेस्ट कॉमेडी सीन ग्रेट ‘इंडिया कॉमेडी’ या यूट्यूब चॅनलने शेअर केला आहे. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचे चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहे. अल्लू अर्जुनचे केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नव्हे, तर अगदी बॉलिवूडमध्ये देखील खूप चाहते आहेत. ‘पुष्पा’ या चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता गगनाला भिडली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा