Thursday, March 28, 2024

Birthday Special : प्रेमात 3 वेळा अपयश येऊन 12 वर्षाने लहान असणाऱ्या सैफसोबत अमृता सिंगने थाटला होता संसार

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग ही चित्रपटांपेक्षा तिचे लग्न आणि घटस्फोट यामुळेच खूप चर्चेत राहिली आहे. अमृताने बॉलिवूडमधील बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते. एकेकाळी तर ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. अमृताने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु स्वतःपेक्षा 12 वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केल्याने ती चर्चेत आली. अमृता आणि सैफ अली खान यांनी लग्नाच्या 13 वर्षानंतर घटस्फोट घेतला. आज एकीकडे सैफ करिनासोबत आनंदात आहे, तर दुसरीकडे अमृता ही आपल्या 2 मुलांसोबत आनंदात राहते. सैफनंतरही, तिच्या आयुष्यात ती 3 वेळा प्रेमात पडली होती. परंतु ते प्रेम पूर्ण झाले नाही. गुरुवारी(9 फेब्रुवारी) अमृता तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया अमृता आणि सैफचे प्रेमकहाणी…

अमृता सिंगने 1983 साली ‘बेताब’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यामध्ये सनी देओल हा मुख्य भूमिकेत होता. खरं पाहायचं झालं, तर या चित्रपटात धर्मेंद्र यांनीच अमृताला आपल्या मुलाची नायिका म्हणून घेतले होते. हा चित्रपट पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता. तसेच अमृता आणि सनीची जोडी देखील चाहत्यांना खूपच आवडली होती.

त्यानंतर 1984 मध्ये अमृता आणि सनीला पुन्हा एकदा ‘सनी ‘या चित्रपटासाठी निवडण्यात आले होते. या चित्रपटात ‘शर्मिला टागोर’ सुध्दा महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. त्यावेळी अमृतालाही माहित नव्हते की, पुढे जाऊन अमृता त्यांची सासू बनणार आहे. माध्यमांतील काही वृत्तांनुसार त्याकाळात सोबत काम करत असल्याने अमृता आणि सनी एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तसे त्यांचे नाते कधी लोकांसमोर उघड नाही झाले. परंतु दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

असं म्हटलं जातंय की, सनी व्यतिरिकतही रवी शास्त्री आणि विनोद खन्ना अमृताच्या खूप जवळ आले होते. एकेकाळी अमृताला विनोद खन्ना देखील खूप आवडत होते. परंतु ते प्रेम देखील अपूर्ण राहिले. यातच अमृताच्या आयुष्यात सैफ अली खान आला. आणि ते एकमेकांच्या प्रेमात पूर्णतः बुडाले होते. 1991 मध्ये जेव्हा अमृता आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होती, तेव्हाच तिने स्वत: पेक्षा 12 वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केले.

अमृता सिंग ही सैफपेक्षा वयाने मोठी होती. त्यामुळे त्यावेळी मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. सैफ आणि अमृता यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांना या गोष्टीचा काहीही फरक पडला नव्हता.

सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले झाली. परंतु जेव्हा सैफ आणि अमृता यांच्यात वाद होऊ लागले, तेव्हा 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आणि एकमेकांपासून वेगळे झाले. आता अमृता आपल्या 2 मुलांसोबत अपार्टमेंटमध्ये राहते, तर सैफ आपली दुसरी पत्नी करिना कपूर खान हिच्यासोबत पतौडी पॅलेसमध्ये राहतो. त्यांची मुले सारा आणि इब्राहिम यांनी त्यांची आई अमृता तसेच वडील सैफ यांच्यासोबतही चांगले संबंध निर्माण झाले.(amrita singh fell in love with these celebs before getting married to saif ali khan 2)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वनीचं लग्न’, म्हणत अभिनेत्रीने शेअर केले सुंदर फाेटाे

नवाजुद्दीनच्या पत्नीवर त्याच्याच वकिलाने लावले गंभीर आरोप, वाच काय आहे संपुर्ण प्रकरण

हे देखील वाचा