Wednesday, October 30, 2024
Home कॅलेंडर ज्याच्यावर दुनिया फिदा, त्याच्याही लग्नात आली होती बाधा, अशी आहे अल्लू अर्जुनची भन्नाट लवस्टोरी

ज्याच्यावर दुनिया फिदा, त्याच्याही लग्नात आली होती बाधा, अशी आहे अल्लू अर्जुनची भन्नाट लवस्टोरी

दाक्षिणात्य अभिनेते आणि त्यांची लोकप्रियता यांची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. या अभिनेत्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा होत असते ती सुपरस्टार अल्लू अर्जुनची. अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा दाक्षिणात्य चित्रपट जगताचा सर्वात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. या अभिनेत्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि देखण्या लूकने त्याने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्लू अर्जुनचा प्रत्येक चित्रपट सुपरहीट ठरत असतो हे त्याच्या दमदार अभिनयाचे यश आहे. त्यामुळेच या देखण्या अभिनेत्यावर लाखो तरुणी फिदा आहेत. मात्र अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीच्या( Sneha Reddy) वडिलांना मात्र जावई म्हणून अल्लू अर्जुन अजिबात पसंत नव्हता.  शनिवारी (8 एप्रिल) अल्लू अर्जुनचा वाढदिवस, जाणून घ्या  त्याच्या लग्नाचा आणि गोड लवस्टोरीचा हा भन्नाट किस्सा .

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या पुष्पा चित्रपटाच्या यशाने सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाच्या यशाने अल्लू अर्जुनच्या मानधनातही मोठी वाढ केली आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची जितकी चर्चा होत असते. तितकीच चर्चा त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही होताना दिसते. अल्लूची पत्नी स्नेहा एखाद्या अभिनेत्रीला लाजवेल अशी देखणी आहे. अल्लू आणि स्नेहाची प्रेमकथाही तितकीच भन्नाट आहे. कारण ज्या हिरोवर देशातल्या तरुणी जीव ओवाळून टाकतात त्याला त्याच्या सासऱ्याने मात्र नापसंत केले होते. अल्लू अर्जुन आणि स्नेहाची ओळख त्यांच्या एका कॉमन मैत्रिणीमुळे झाली होती.

स्नेहा ही एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे. अल्लूची पत्नी स्नेहा ही परदेशात शिकायला होती. भारतात आल्यानंतर त्यांची एका लग्नात पहिल्यांदा भेट झाली. पहिल्याच भेटीत अल्लू अर्जुन स्नेहाच्या सौंदर्यावर घायाळ केले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यांच्यात बोलणे वाढले. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण जेव्हा हा त्यांच्या लग्नाची चर्चा स्नेहा अर्जुनच्या घरी समजली तेव्हा तिच्या वडिलांनी लग्नाला नकार दिला होता. मात्र अल्लू अर्जुननेही हार न मानता त्यांना समजावण्याचे अनेक प्रयत्न केले आणि शेवटी त्यांनी अल्लू अर्जुनला जावई म्हणून पसंत केले. अल्लू अर्जुन आणि स्नेहाचा विवाह सोहळा 6 मार्च 2011 ला पार पडला. स्नेहा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. (allu arjun birthday know about her lovestory)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाच्या आधी आलेल्या ‘या’ पाच चित्रपटांनी बनवले त्याला सुपरस्टार अभिनेता
सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘या’ बाबतीत ‘थलायवा’लाही टाकले मागे, वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा