साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन आज (८ एप्रिल) रोजी त्याचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात २००३ साली आलेल्या ‘गंगोत्री’ सिनेमाने केली. अल्लू अर्जुनने त्याच्या १९ वर्षाच्या करिअरमध्ये ‘पुष्पा’ चित्रपटाच्या आधी देखील अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर, ड्रामा सर्वच प्रकारच्या चित्रपटांमधून त्याने त्याच्यातील उत्तम अभिनेत्याला जगासमोर सिद्ध केले. आज अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या अशा ५ चित्रपटांबद्दल ज्यांनी बक्कळ कमाई तर केली सोबतच त्याला सुपरस्टार म्हणून ओळखही मिळवून दिली. हे सर्व सिनेमे हिंदीमध्ये देखील उपलब्ध असून ते आपण यूटुबवर अथवा टीव्हीवर पाहू शकतो.

बनी द सुपर हिरो :
अल्लू अर्जुनाचा हा रोमॅंटिक सिनेमा २००५ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत प्रकाश राज, गौरी मुंजाल, रघु बाबू , शरत कुमार मुख्य भूमिकेत होते. या सिनेमाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता.
डीजे :
अल्लू अर्जुनच्या करिअरमधील चांगल्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणून डीजे सिनेमा ओळखला जातो. हा सिनेमा हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन अपराधाविरोधात लढताना दिसतो आणि चुकीच्या लोकांना पोलिसांसोबत मिळवून शिक्षा करतो. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे.
येवडू :
अल्लू अर्जुन आणि रामचरण यांचा हा सिनेमा २०१४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रुती हसन आणि काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होत्या. तर एमी जॅक्सन आणि राहुल देव महत्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा हिंदीमध्ये देखील उपलब्ध आहे.
अंतिम फैसला :
अल्लू अर्जुनाचा हा सिनेमा हिंदीमध्ये देखील डब आहे. राधा कृष्ण जागरलालमुरी दिग्दर्शित या सिनेमात अल्लू अर्जुनसोबत अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत होती. २०१० साली आलेल्या या सिनेमात दमदार ऍक्शन पाहायला मिळाली.
डेंजरस खिलाडी :
अल्लू अर्जुनाचा हा एक ऍक्शन थ्रिलर सिनेमा असून २०१३ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अर्जुनची ऍक्शन आणि आणि त्याचा अभिनय पाहून सर्वच खूप खुश होते. या सिनेमाचा सिक्वल देखील आला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- Amit Trivedi B’day: अमित त्रिवेदीवर लागला होता चोरीचा आरोप अशी झाली संगीत दिग्दर्शकाची अवस्था
- Yo Yo Honey Singh | शोदरम्यान अज्ञातांनी केला हनी सिंगवर हल्ला, रॅपरने दाखल केली एफआयआर
- KGF Chapter 2 | चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू, केवळ १२ तासांतच केली बंपर कमाई!