Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड अल्लू अर्जुनचा चाहत्यांना सुखद धक्का; पुष्पा 2 रिलीजपूर्वीच केली मोठी घोषणा

अल्लू अर्जुनचा चाहत्यांना सुखद धक्का; पुष्पा 2 रिलीजपूर्वीच केली मोठी घोषणा

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या पुष्पा २ मुळे चर्चेत आहे. लवकरच पुष्पा २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पुष्पा- द राइज’ गाजल्यानंतर त्याचा दुसरा सिक्वल पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अल्लूने आपल्या चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

एका मुलाखतीदरम्यान, अल्लू अर्जुनने पुष्पा ३ ची घोषणा केली आहे. त्याच्या या घोषणेमुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अल्लू अर्जुन म्हणाला, ‘तुम्ही निश्चितपणे पुष्पाच्या तिसऱ्या पार्टची अपेक्षा करु शकता. आम्हाला याची फ्रँचायझी बनवायची आहे. आमच्याकडे लाइनअपसाठी अनेक भन्नाट कल्पना आहेत.’ अल्लू अर्जुनच्या या वक्तव्यामुळं चाहते दिग्दर्शक सुकुमार पुष्पा फ्रँचायझीची कथा कशी पुढे नेतील हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

सध्या अल्लू अर्जुन पुष्पा २ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पहिल्या पार्टची कथा जिथे संपली, तिथून Pushpa 2: The Rule ची कथा सुरू होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अल्लू अर्जुनसह रश्मिका मंदाना या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अभिनेता फहद फासिलदेखील या चित्रपटाचा भाग असणार आहे.

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या सिनेमाच्या रिलीजची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘पुष्पा’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘बाहुबली’मध्ये संजय दत्त झाला असता कट्टाप्पा, ‘या’ कारणामुळे नाकारला चित्रपट
गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर, रिचा चढ्ढाने शेअर केला सुंदर व्हिडिओ, बेबी बंप केला फ्लॉन्ट

हे देखील वाचा