Monday, April 21, 2025
Home साऊथ सिनेमा लेकीला घेवून गणपती विसर्जनासाठी आला दाक्षिणात्य सुपरस्टार, अल्लू अर्जुनच्या साधेपणावर चाहते झाले फिदा

लेकीला घेवून गणपती विसर्जनासाठी आला दाक्षिणात्य सुपरस्टार, अल्लू अर्जुनच्या साधेपणावर चाहते झाले फिदा

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. सिनेविश्वातही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले होते आणि आता लोक त्यांच्या श्रद्धेनुसार दोन, तीन, पाच दिवसांच्या सेवेनंतर बाप्पाला निरोप देत आहेत. आता दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुननेही गणपती बाप्पाला निरोप दिला. ज्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

अल्लू अर्जुन हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकाच तो सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत असतो. सध्या अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवरून गणपती बाप्पा मोरियाच्या कॅप्शनसह गणपती विसर्जनाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

या व्हिडिओमध्ये तो आपल्या मुलीला कडेवर घेतलेला  दिसत आहे आणि त्याच्या दुसर्‍या हातात गणपतीची छोटी मूर्ती आहे. जी तो इतरांना देतो. लोक विसर्जन करत आहेत. यादरम्यान तो नारळ फोडतो. व्हिडिओमध्ये तो गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना दिसत होता. अभिनेता अल्लू अर्जुन देखील त्याच्या मुलीला हातात घेऊन लोकांसोबत नाचताना दिसतो. सध्या चाहत्यांना त्याची स्टाईल खूप आवडली आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते हृदय आणि फायर इमोटिकॉन्ससह आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत.

‘पुष्पा’ चित्रपटाच्या यशाने अभिनेता अल्लू अर्जुन संपूर्ण भारताचा स्टार बनला आहे. त्याच्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. चाहते आता पुष्पा भाग दोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – अरेरे! तारक मेहता कार्यक्रम सोडल्यानंतर अशी झाली सोनूची अवस्था, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
अमिताभ बच्चन यांची नात नव्याला डेट करतोय सिद्धांत चतुर्वेदी? पहिल्यांदाच केला खुलासा
विचित्र ड्रेस घातल्याने रुबिना दिलैक झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘दुसरी उर्फीच…’

हे देखील वाचा