Wednesday, June 26, 2024

सुपरस्टार अल्लू अर्जुनने ‘या’ बाबतीत ‘थलायवा’लाही टाकले मागे, वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है!’

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राईज‘ चित्रपटाने लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड मोडित काढले आहेत. प्रदर्शाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने सर्वत्र जोरदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होण्याचा मान मिळवला आहे. या चित्रपटाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या चित्रपटाच्या यशाने जोरदार कमाई तर केलीच. मात्र, चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनच्याही लोकप्रियतेत वाढ झाली आहे. इतकेच नव्हेतर लोकप्रियतेत अल्लूने सुपरस्टार रजनीकांत यांनाही मागे टाकले आहे.

पुष्पा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आणि या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला (Allu Arjun) यशाच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. सध्या सर्वत्र अल्लूच्या या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. फक्त दक्षिणेतच नाही, तर या चित्रपटाने संपूर्ण देशभर प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. चित्रपटातील अल्लूच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. आपल्या कसदार अभिनयाने अल्लूने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच त्याच्या लोकप्रियतेतही मोठी वाढ झाली आहे.

अल्लूने लोकप्रियतेत आता रजनीकांत (Rajinikanth) यांनाही टक्कर दिली आहे. कारण समोर आलेल्या माहितीनुसार अल्लू अर्जुनचे ट्विटरवर 6.5 मिलियन इतके फॉलोव्हर्स आहेत. तो ट्विटरवर कोणालाही फॉलो करत नाही. त्याचबरोबर सुपरस्टार रजनीकांत यांचे ट्विटरवर 6.1 इतके फॉलोव्हर्स आहेत. रजनीकांत आपली मुलगी ऐश्वर्या, धनुष, अमिताभ बच्चनसह 24 जणांना फॉलो करतात. या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर चिरंजीवी आहेत. 1.2 मिलियन फॉलोव्हर्स असलेले चिरंजीवीही कुणाला फॉलो करत नाहीत.

दरम्यान ज्या चित्रपटाने अल्लू अर्जुनला प्रचंड लोकप्रियता मिळवुन दिली. त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सगळ्यांना वेड लावले. हिंदी सह इतर अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्यासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पायाला पट्टी बांधलेली असतानाही विराट कोहली थिरकला शाहरुख खानसोबत, व्हिडिओ व्हायरल
BIRTHDAY SPECIAL : अल्लू अर्जुनने वयाच्या २ ऱ्या वर्षी चित्रपटात केले काम, ‘या’ चित्रपटातून केले होते अभिनयात पदार्पण

हे देखील वाचा