माधुरी दीक्षित ते हरभजन सिंगपर्यंत, ‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या सुपरस्टार रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


दक्षिण चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) रविवारी (१२ डिसेंबर) त्यांचा ७१वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. यानिमित्ताने बॉलिवूडपासून दक्षिणात्य चित्रपट सृष्टीपर्यंतचे मोठे कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. (these celebs including dhanush madhuri dixit harbhajan singh wished superstar rajinikanth on his birthday)

धनुषने दिल्या खास शुभेच्छा
दक्षिणात्य सुपरस्टार धनुषने त्याच्या सासऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या अधिकृत ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा माझे थलायवा.. एकटे सुपरस्टार रजनीकांत सर… माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे.”

अनिरुद्ध रविचंदरने दिल्या शुभेच्छा
अनिरुद्ध रविचंदरने त्याच्या ट्विटर हँडलवर रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो ट्विटरवर शेअर करत त्याने लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा थलायवा.. आम्ही तुमच्यावर पूर्वी, आता आणि कायमचे प्रेम करत राहू.”

माधुरी दीक्षितने दिल्या शुभेच्छा
धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता जॅकी श्रॉफही दिसत आहेत. हा फोटो ट्विटरवर शेअर करत तिने लिहिले की, “तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थलायवा रजनीकांत सर, तुम्ही मला भेटलेल्या सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहात आणि तरीही खूप नम्र व्यक्ती आहात. तुमच्या सुखी आयुष्यासाठी मी प्रार्थना करते.”

हरभजन सिंगने दिल्या शुभेच्छा
यासोबतच माजी भारतीय क्रिकेटर आणि अभिनेता हरभजन सिंगनेही रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ट्विटरवर पोस्ट केली आहे.

दादासाहेब फाळके पुरस्काराने करण्यात आले सन्मानित
चित्रपटांमधील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल, रजनीकांत यांना २००० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर रजनीकांत यांना २०१४ मध्ये भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना अवॉर्ड फॉर इंडियन फिल्म पर्सनलिटी ऑफ द ईयर देखील प्रदान करण्यात आला होता. गेल्या महिन्यात त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

सुपरस्टार रजनीकांत यांनी १९८३ मध्ये ‘अंधा कानून’ या चित्रपटातून सुरुवात केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. पण त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!