Friday, July 5, 2024

मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाविषयी चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. आताही असेच काहीसे आहे. अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि अनेक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखीच वाढला आहे. अशामध्ये आता अभिनेत्याचा ‘पुष्पा’ चित्रपटातील नवीन लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूमध्ये अल्लू एकदम डॅशिंग अंदाजात पाहायला मिळत आहे. त्याचा हा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अल्लूचे हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता अल्लू अर्जुनने आपले हे पोस्टर अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. (Allu Arjun New Look From Pushpa New Song Eyy Bidda Idhi Naa Adda Will Be Release On 19 November)

खरं तर, अल्लूने इंस्टाग्राम अकाऊंटवर जो लूक शेअर केला आहे. तो त्याचा आगामी चित्रपट ‘पुष्पा’ या चित्रपटातील गाणे ‘एय बिद्दा ईधी ना अड्डा’मधील आहे. यामध्ये अभिनेत्याचा डॉन स्टाईल लूक पाहायला मिळत आहे. तो मोठे केस, मोठी दाढी, कपाळी टिक्का आणि काळा चष्मा लावून डॅशिंग अवतारात दिसत आहे.

अभिनेत्याच्या या पोस्टरवरून असे वाटते की, त्याच्या या चित्रपटातील नवीन गाणे कदाचित आयटम नंबर असावे. अभिनेत्याने आपले हे पोस्टर पाच भाषांमध्ये इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत अल्लूने कॅप्शनमध्ये लिहिले की, “‘पुष्पा’ चित्रपटातील माझे आवडते गाणे. यासाठी मी देखील खूप उत्साहित आहे.” नवीन लूक प्रदर्शित करण्यासोबतच नवीन गाण्याची प्रदर्शनाची तारिखही जाहीर करण्यात आली आहे. हे गाणे १९ नोव्हेंबरला युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे.”

‘एय बिद्दा ईधी ना अड्डा’ या गाण्यापूर्वी ‘पुष्पा’मधील अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यात ‘सामी सामी’, ‘डाको डाको मेका’ आणि ‘श्री वल्ली’ या गाण्यांचा समावेश आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग २५ डिसेंबर, २०२१ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्याशिवाय जगपती बाबू, अनसूया भारद्वाज आणि वेनेला किशोरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच फहद फासिल या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. यातून तो टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाची निर्मिती मैथ्री मुव्ही मेकर्स आणि मुत्तमसेट्टी मीडिया करत आहेत.

अल्लूचे चाहते ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’

-जेव्हा वैतागलेल्या हेमा मालिनींनी आईला दिली होती चित्रपटसृष्टी सोडण्याची धमकी, जाणून घ्या काय होतं कारण

-अरे बापरे! चक्क उकळत्या तेलात हात घालून व्यक्तीने केले चिकन फ्राय, टायगर श्रॉफही झाला हैराण

हे देखील वाचा