Saturday, April 20, 2024

जेव्हा वैतागलेल्या हेमा मालिनींनी आईला दिली होती चित्रपटसृष्टी सोडण्याची धमकी, जाणून घ्या काय होतं कारण

बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी या अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयानेच नाही, तर आपल्या डान्सनेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. हेमा मालिनी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले. पण असे असतानाही हेमा मालिनी यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये कधीही बोल्ड सीन्स दिले नाहीत, ना कोणत्याही दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून त्यांच्या लूक आणि सीन्सशी तडजोड केली.

आईवर झाल्या होत्या नाराज
माध्यमांशी संवाद साधताना, हेमा यांनी एक किस्सा सांगितला की, त्या त्यांच्या आईवर खूप नाराज झाल्या होत्या. हेमा यांनी सांगितले की, त्यांना एका चित्रपटात रोमँटिक सीन करायचा होता. पण यादरम्यान हेमा आपल्या आईवर इतक्या नाराज झाल्या की, त्यांनी शूटिंग सोडून घरी जाण्यास तयार झाल्या.

हेमा यांच्या रागाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता, की त्यांनी आपल्या आईला फिल्मी दुनियेत काम न करण्याचीही गोष्ट सांगितले होती. हेमा यांनी राज कपूर यांच्या ‘सपनो के सौदागर’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि पहिल्याच चित्रपटापासून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण केले. फिल्मी दुनियेत काम करण्याची कल्पना हेमा यांची नव्हती.

हेमा मालिनी यांची आई करायची चित्रपटांची निवड
हेमा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, त्यांना फिल्मी दुनियेत हिरोईन बनवण्याचा निर्णय त्यांची आई जया यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट ऐकण्यापासून ते पैसे पाहण्यापर्यंतचा सगळा हिशेब त्यांची आई सांभाळत असे. इतकंच नाही, तर हेमा यांची आई देखील त्यांच्यासोबत प्रत्येक शूटवर हजर असायच्या. हेमा यांनी स्वत: खुलासा केला होता की, लग्नापूर्वी त्या शूटिंगच्या सेटवर कधीही एकट्या गेल्या नाहीत.

हेमा मालिनी यांनी शेअर केला किस्सा
एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक किस्सा शेअर करताना हेमा म्हणाल्या की, जेव्हा दिग्दर्शकाला त्यांना रोमँटिक सीनमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करावे असे वाटत होते, तेव्हा त्यांची आई त्यांना तो सीन करण्यापासून सतत रोखत होती. त्यादरम्यान हेमा, दिग्दर्शक आणि आई यांच्यात इतक्या अडकल्या की, त्यांनी शूटिंग सोडले. हेमा यांनी सांगितले की, त्यांची आई काही सीनबाबत खूप प्रोटेक्टिव्ह असायची, त्यामुळे दिग्दर्शक त्यांना आणि त्यांच्या आईला वेगळे सीन ऐकवायचे.

‘आज मी माझ्या आईचे आभार मानते’
हेमा मालिनी यांनीही या खास संवादात सांगितले की, एक वेळ अशी आली होती की, त्यांनी थेट आईला चित्रपटसृष्टी सोडण्याची धमकी दिली होती. मात्र, त्यांच्यामुळेच ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांची फिल्मी दुनियेत चांगली इमेज आहे. त्या आज त्यांच्या आईचे आभार मानतात. असा विश्वास हेमा मालिनी यांनी व्यक्त केला. हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांची आई त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा