चित्रपट जगतात गाण्यांना खूप महत्त्व आहे. मग ती चित्रपटातील असो, नाहीतर अल्बममधील असो. आजच्या युगात गाणी रिलीझ केली जातात आणि रसिक यावरील त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करतात. आजकाल गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अॅप्सही आले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा गाणी ऐकण्यासाठी ऑडिओ कॅसेट किंवा रेडिओचा आधार घ्यावा लागत असे. त्यावेळी स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा आयपॅड नव्हते. अशा काळात एक असे गाणे रिलीझ झाले होते, ज्याने संपूर्ण जगात धमाल केली. हे गाणे केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही ऐकले गेले. आम्ही ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, त्याचे बोल आहेत ‘तुम तो ठेहरे परदेसी, साथ क्या निभाओगे.’ हे गाणे तुम्हीही ऐकले असेलच. पण आज आम्ही तुम्हाला या गाण्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही क्वचितच ऐकल्या असतील.
‘तुम तो ठेहरे परदेसी’ हे गाणे तुम्ही कधी ना कधी तरी ऐकले असेलच. ९० च्या दशकात रिलीझ झालेल्या या गाण्याच्या तब्बल ७० लाख कॅसेट्स एका रात्रीत विकल्या गेल्या होत्या. इतर गाण्यांचे विक्रम या गाण्याने मोडले होते. हे गाणे १९९७ मध्ये रिलीझ झाले आणि याबद्दल लोकांना इतके वेड होते होती की, त्याच्या कॅसेट्स बाजारात येताच विकल्या जायच्या. त्यावेळी स्थिती अशी झाली होती की, जर कॅसेट संपली, तर लोक कॅसेट खरेदी करण्यासाठी दुसर्या शहरात जात असत.
आजच्या युगात ज्याप्रकारे चाहते अरिजित सिंगसाठी वेडे आहेत. त्याच प्रकारची क्रेझ त्याकाळी गायक अल्ताफ राजाची होती. हे प्रसिद्ध गाणेही अल्ताफ राजाने आणले होते. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये, अल्ताफ हे गाणे गात आहेत आणि मागे एक प्रेमकथा दाखवली गेली आहे. या गाण्यासाठी लोक इतके वेडे झाले होते की, चहाची टपरी, गल्ली-बोळा, दुकान, पार्टी, घर, बस इत्यादी ठिकाणी हे गाणे ऐकले जात असे. जवळजवळ ७ महिने या गाण्याची जादू कायम राहिली.
लाखो ऑडिओ कॅसेट विकल्या गेल्या आणि सोबतच याला त्या वर्षाचे सर्वाधिक लोकप्रिय गाणे मानले गेले होते. सर्वाधिक ऑडिओ कॅसेट विकल्यामुळे, हे गाणे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंदवले गेले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफही आहेत खूपच सुंदर; मॉडेल- अभिनेत्रीनंतर आता बनल्यात निर्मात्या
-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी