Friday, March 29, 2024

‘या’ कारणामुळे माधुरी दीक्षितसोबत लग्नाला दिला होता प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी नकार, अभिनेत्रीचे कुटुंबीय झाले होते निराश

बॉलिवूडमधील ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने, डान्सने आणि सौंदर्याने आपल्या कारकिर्दीत सर्वांना वेड लावले होते. तिने अनेक सुपरहिट कलाकारांसोबत काम केले आहे. त्या काळात केवळ प्रेक्षक नव्हे, तर अनेक कलाकार देखील तिच्या प्रेमात होते. तिची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असायचे. एवढंच काय तरी तिचे लग्न झाल्यावर अनेक चाहत्यांसोबत अनेक अभिनेत्यांचे देखील हृदय तुटले होते. पण तुम्हाला माहित आहे का? बॉलिवूडमधील या अभिनेत्रीचा लग्नाचा प्रस्ताव प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी नाकारला होता. शनिवारी (15 मे) माधुरीने तिचा 54 वा वाढदिवस साजरा केला. जाणून घेऊया तिच्या लग्नाबाबत एक मजेशीर किस्सा.

असे म्हटले जाते की, माधुरी दीक्षितच्या आई- वडिलांना ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे हे अजिबात आवडत नव्हते. परंतु तिने तरीही तिचे काम सुरू ठेवले. माधुरीच्या या निर्णयानंतर तिच्या आई- वडिलांना तिची खूप काळजी वाटू लागली होती. यातच तिच्या घरच्यांना असे वाटत होते की, माधुरीने लवकरात लवकर लग्न करावे आणि तिचा संसार थाटावा. त्यांना असे वाटत होते की, जर माधुरी अशीच चित्रपटात काम करत राहिली, तर तिला चांगेल स्थळ मिळणार नाही.

त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी चांगला मुलगा बघायला सुरुवात केली होती. यामध्ये त्यांनी गायक सुरेश वाडकर यांच्या समोर माधुरीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु त्यांनी केवळ माधुरीचा फोटो बघून तिला नकार दिला होता. ते असे म्हणले होते की, ती मुलगी तब्बेतीने खूपच लहान आहे. त्यांनी केवळ फोटो बघूनच त्यांचा नकार दर्शवला होता. या घटनेनंतर माधुरीच्या घरचे खूप निराश झाले होते.

पण कदाचित तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. तिने चित्रपटात काम केले. त्यांनतर तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अशी काही जादू केली की, तिला पाहून प्रत्येकजण म्हणू लागला की, ‘दिल तो पागल है…’

माधुरी दीक्षितने तिच्या कारकिर्दीत बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके हैं कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सध्या ‘डान्स दीवाने 3’ या शोला ती जज करत आहे.

माधुरी दीक्षितने 1999 मध्ये श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केले आहे. श्रीराम नेने हे डॉक्टर आहेत. तसेच माधुरी दीक्षितला दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वयाव्या २० व्या वर्षीच सोनल चौहान बनली होती ‘मिस वर्ल्ड टुरिझम’, वाढदिवशीच रिलीझ झाला होता तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट

-जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफही आहेत खूपच सुंदर; मॉडेल- अभिनेत्रीनंतर आता बनल्यात निर्मात्या

-‘द कपिल शर्मा शो’मधील ‘ही’ अभिनेत्री आहे बेरोजगार; दीर्घकाळापासून लढतेय महाकाय आजाराशी

हे देखील वाचा