Saturday, June 29, 2024

हिंदी मनोरंजन जगतात उडणार लग्नाचा बार, बिगबॉसमधील ‘ही’ प्रसिद्ध जोडी बांधणार लग्नगाठ

बिग बॉसच्या घरातून लोकप्रिय झालेला अली गोनी (Aly Goni) आणि जॅस्मिन भसीन (Jasmin Bhasin) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. या कार्यक्रमात दोघांची चांगलीच केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये या बातमीने आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन त्यांनी ही बातमी शेअर केली आहे. आता या विवाह सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

अलि गोनी आणि जॅस्मिन भसीन दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. खतरों के खिलाडी या कार्यक्रमापासून त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात झाली होती. या कार्यक्रमातच दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळाली होती. आता दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या लवस्टोरीचा आता थेट लग्नाच्या बंधनात गोड शेवट होणार आहे. अलिकडेच अली गोणीने त्याच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्यांच्या लग्नाबद्दलचा खुलासा केला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अलीने “शेवटी सगळं फिक्स झाल आहे. आम्ही दोघांनी आमच्या पालकांना याबाबत सांगितले आहे. आता निमंत्रण पत्रिका वाटणे बाकी आहे. मात्र त्याआधी आम्ही सोशल मीडियावरुन चाहत्यांना सांगण्याचा निर्णय घेतल्याचे” सांगितले आहे. अली गोनी प्रमाणेच जॅस्मिननेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन त्यांच्या लग्नाबद्दल तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. ज्यामध्ये तिने “तुम्ही सगळ्यांनी अलीचा व्हिडीओ पाहिला असेल, आम्ही दोघांनी आता हा निर्णय घेतला असल्याचे म्हणले आहे. दरम्यान व्हिडिओच्या शेवटी तिने याबद्दल लवकरचं तारीख सांगू असेही म्हणले आहे.” आता त्यांच्या चाहत्यांना या जोडीच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा